Video : दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या भीतीने इंग्लंडच्या खेळाडूची भर मैदानात विचित्र मागणी, गिल म्हणाला…

भारताकडे दुसरा कसोटी सामना जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे. भारतीय संघ विजयापासून फक्त 7 विकेट दूर आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी काय होते याकडे लक्ष लागून आहे. असं असताना हॅरी ब्रूकने शुबमन गिलकडे विचित्र मागणी केली.

Video : दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या भीतीने इंग्लंडच्या खेळाडूची भर मैदानात विचित्र मागणी, गिल म्हणाला...
दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या भीतीने इंग्लंडच्या खेळाडूची भर मैदानात विचित्र मागणी, गिल म्हणाला...
Image Credit source: video grab
| Updated on: Jul 06, 2025 | 3:15 PM

इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताच्या पारड्यात झुकलेला आहे. शेवटच्या दिवशी 7 विकेट घेण्यात भारतीय संघाला यश आलं तर विजय निश्चित आहे. पण शेवटच्या दिवशी पावसाचं चिन्ह आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ देखील होऊ शकतो. पहिल्या डावात भारताकडे 180 धावांची आघाडी होती. त्यापुढे खेळताना 6 विकेट गमवून 427 धावा केल्या आणि 607 धावांचं लक्ष्य गाठलं. तसेच विजयासाठी 608 धावा ठेवल्या. शुबमन गिलने पहिल्या डावात 269 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 161 धावा केल्या. त्याची फलंदाजी पाहून इंग्लंडच्या खेळाडूंना घाम फुटला होता. त्यामुळे त्यांनी माईंडगेम खेळण्यास सुरुवात केली. शुबमन गिलची फलंदाजी पाहून हॅरी ब्रूकच्या कपळ्यावर आठ्या पडल्या होत्या. त्याने या सामन्यात काय बोलला ते सर्व काही रेकॉर्ड झालं आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा भारताने 450 धावा केल्या तेव्हा ब्रूकने गिलला डाव घोषित करावा यासाठी डिवचत होता. पण शुबमन गिलने तसं काही केलं नाही.

हॅरी ब्रुकने शुभमन गिलला काय म्हटले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हॅरी ब्रूक म्हणाला की, ‘450 धावांवर डाव घोषित करा. उद्या पाऊस पडणार आहे. दुपारी अर्धा दिवस पाऊस पडत असेल.’ उत्तरात गिल म्हणाला, ‘हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे.’ यानंतर ब्रूकने पुन्हा शुभमन गिलला सांगितले, ‘ड्रॉ घ्या.’ पण टीम इंडियाची आघाडी 600 धावांच्या पुढे गेली तेव्हा कर्णधार शुबमन गिलने 427 धावांवर आपला डाव घोषित केला. शुबमन गिलने डाव घोषित केल्यानंतरही इंग्लंडचा संघ संकटात आला. आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांच्या घातक गोलंदाजीने इंग्लंडला तीन धक्के बसले.

एजबेस्टन कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या हवामान अंदाज कसा असेल याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा आहे. अ‍ॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, सकाळी मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पावसाची 79 टक्के पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवसाचा खेळ स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होईल. तर दुपारी 1 वाजेपर्यंत पुन्हा पावसाची शक्यता आहे. ही शक्यता 22 टक्क्यांपर्यंत कमी होईल.