चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान कंगाल! सोशल मीडियावर घेतली फिरकी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताचे सामने हे दुबईत होणार आहेत. या स्पर्धेतून पैसा कमवण्याचा मानस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आहे. पण पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला दणका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता फिरकी घेणारे मीम्स व्हायरल होत आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान कंगाल! सोशल मीडियावर घेतली फिरकी
| Updated on: Feb 19, 2025 | 6:03 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडने पहिल्या डावात पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. विल यंगने 113 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 107 धावा केल्या. त्याला टॉम लॅथमची उत्तम साथ लाभली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसलं. ओपनिंग सामन्यातर कराची नॅशनल स्टेडियममधील खुर्च्या रिकामी दिसल्या. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतच ही बाब उघड झाली आहे. खरं तर 29 वर्षांनी पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होईल असा अंदाज होता. पण तसं काहीच झालं नाही. ज्या पद्धतीने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सांगत होतं त्याच्या उलट चित्र पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं.

पाकिस्तानी प्रेक्षकांनी स्पर्धेकडे पाठ फिरवल्याने नेटकऱ्यांनी क्रिकेट बोर्डाची फिरकी घेतली. एका युजर्सने लिहिलं की, ‘कराचीची गर्दी कुठे आहे? तुम्हाला तीन दशकानंतर आयसीसीचं यजमानपद मिळालं. पण लोकांचा पाठिंबा काही मिळाला नाही.’ दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, देशात सामना होत असताना पाकिस्तानच्या प्रेक्षकांचा टीमला पाठिंबा नाही. प्रेक्षकांनी स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. या स्टेडियमची क्षमता जवळपास 30 हजार लोकांची आहे. पण त्याच्या अर्धही स्टेडियम भरलेलं नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तानची प्लेइंग 11: फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.

न्यूझीलंडची प्लेइंग 11: विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, नॅथन स्मिथ, विल ओ’रोर्क.