IPL 2021 : आयपीएलसाठी परदेशी खेळाडू न आल्यास कारवाई, BCCI पाऊल उचलणार

| Updated on: Jun 03, 2021 | 6:30 PM

कोरोन संकटामुळे स्थगित झालेली आयपीएल 2021 आता युएईत घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती दिली.

IPL 2021 : आयपीएलसाठी परदेशी खेळाडू न आल्यास कारवाई, BCCI पाऊल उचलणार
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) उर्वरीत इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) खेळवणार असल्याची माहिती नुकतीच झालेल्या विशेष कार्यकरणी बेठकीमध्ये दिली होती. येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये उर्वरित आयपीएलचे सामने होणार आहेत. मात्र ठिकाण आणि वेळ बदलल्याने परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (Foreign Players in IPl Salry Reduction could be done if they absent for ipl in UAE says BCCI)

काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने (England Cricket Board) खेळाडूंना टी-20 वर्ल्डकपसाठी (T-20 Wolrd Cup) सराव करायचे कारण देत आयपीएल खेळण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनेही खाजगी कारण देत यूएईला येण्यास नकार दिला. अजूनही काही खेळाडूंच्या येण्यावर प्रश्नचिन्ह असल्याने बीसीसीआय विविध प्रयत्न करुन परदेशी खेळाडूंना खेळवण्याचा प्रयत्नात आहे. मात्र अखेर न खेळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली जाणार असल्याचेही समोर येत आहे.

पगारकपातीची कारवाई

आयपीएलमधील कोणताही संघ एखाद्या खेळाडूवर जेवढी बोली लावतो. तितकी रक्कम पगार म्हणून त्याला दिली जाते. त्यातील काही कर आणि संबधित खेळाडूच्या क्रिकेट बोर्डाला दिल्यानंतर उर्वरीत रक्कम 3 ते 4 टप्प्यांत खेळाडूला दिली जाते. मात्र अशावेळी खेळाडूला दुखापतीशिवाय सामने खेळता आले नाहीत तर त्याचे मानधन कापण्याचा अधिकारही संघाला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) पॅट कमिन्सला (Pat Cummines) 2020 मध्ये 15.5 कोटींना विकत घेतले होते. तो IPL 2021 चे आतापर्यंतचे सामने खेळला आहे. मात्र युएईत रंगणाऱ्या उर्वरित सामन्यांना तो खेळला नाही तर त्याला फक्त 7.75 कोटी रुपये इतकेच मानधन मिळेल.

IPL 2021 चे आयोजन

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे (IPL 2021) सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

(Foreign Players in IPl Salry Reduction could be done if they absent for ipl in UAE says BCCI)