‘हरलात पण तुम्ही मन जिंकलं’, Mithali Raj ने सांगितला पंतप्रधान मोदीं बरोबरच्या भेटीचा ‘किस्सा’, VIDEO

| Updated on: Jul 11, 2022 | 2:12 PM

भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) मागच्या महिन्याात निवृत्त झाली. निवृत्त होण्याआधी मितालीने अनेक रेकॉर्ड केले. भारतीय महिला क्रिकेटला तिने एक वेगळी ओळख मिळवून दिली.

हरलात पण तुम्ही मन जिंकलं, Mithali Raj ने सांगितला पंतप्रधान मोदीं बरोबरच्या भेटीचा किस्सा, VIDEO
mithali-raj
Follow us on

मुंबई: भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) मागच्या महिन्याात निवृत्त झाली. निवृत्त होण्याआधी मितालीने अनेक रेकॉर्ड केले. भारतीय महिला क्रिकेटला तिने एक वेगळी ओळख मिळवून दिली. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ 2017 साली वर्ल्ड कपच्या (World cup 2017) फायनलमध्ये पोहोचला होता. पण इंग्लंडने भारतीय संघाला पराभूत केलं. त्या रोमांचक सामन्यात भारताला इंग्लंडने अवघ्या 9 रन्सने पराभूत केलं होतं. भारतीय महिला टीम वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये हरली. पण कोणीही या संघावर नाराज नव्हतं. कारण या टीमने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचच मन जिंकलं होतं. या पराभवानंतर टीम इंडिया मायदेशी परतली, त्यावेळी या संघाच भव्य स्वागत करण्यात आलं होतं. टीमची कॅप्टन मिताली राजने अलीकडेच एका रियलिटी शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या (Narendra Modi) भेटीचा किस्सा सांगितला. पराभवानंतर संघ निराश होता. पण मोदींनी टीमचं कसं कौतुक केलं, उत्साह वाढवला, तो किस्सा मितालीने सांगितला.

एका स्पर्धकाने तिला प्रश्न विचारला

या रियलिटी शो मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने मितालीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून कसं वाटलं? असा प्रश्न विचारला. “2017 वर्ल्ड कप नंतर संघ मायदेशी परतला, तेव्हा जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी आमच्या संपूर्ण टीमला भेटण्यासाठी वेळ दिला होता. ती सन्मानाची बाब आहे” असं मितालीने सांगितलं. मिताली राजने 232 एकदिवसीय सामन्यात 7 हजार 805 धावा केल्या.

काय म्हणाले होते मोदी त्यावेळी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूला नावानिशी ओळखलं होतं. संघातील प्रत्येक सदस्याच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं होतं. पंतप्रधानांनी वेळ काढून राष्ट्रीय संघाचा उत्साह वाढवला, ही सन्मानाची बाब आहे” असं मिताली म्हणाली. आम्ही हरलो होतो, पण तुम्ही सर्वांची मन जिंकली आहेत, असं मोदी म्हणाल्याची आठवण मितालीने सांगितली. 2017 साली लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड मध्ये फायनलची मॅच झाली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघ फक्त 219 धावाच करु शकला. पूनम राऊतने त्या सामन्यात 86 धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौरने 51 धावांची खेळी केली होती.