AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shabaash Mithu trailer: ‘ऐसा खेल के दिखाएंगे की..’; मिताली राजच्या भूमिकेत तापसीचा षटकार!

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये मितालीचा लहानपणापासूनचा संघर्ष पहायला मिळतो. क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात केल्यानंतर तिच्यासमोर असंख्य अडचणी उभ्या राहतात आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे या ट्रेलरचा शेवट.

Shabaash Mithu trailer: 'ऐसा खेल के दिखाएंगे की..'; मिताली राजच्या भूमिकेत तापसीचा षटकार!
Taapsee Pannu in Shabaash Mithu Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 11:18 AM
Share

अभिनेत्री तापसी पन्नूची (Taapsee Pannu) मुख्य भूमिका असलेल्या ‘शाबाश मिट्ठू’ (Shabaash Mithu) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या (Mithali Raj) आयुष्यावर हा चित्रपट आहे. 1999 मध्ये डेब्यु करणाऱ्या मितालीने 23 वर्षे भारताचं प्रतिनिधित्व केलं. या कारकिर्दीत तिने महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तिचा लहानपणापासूनचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार असून त्याचीच झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. श्रीजित मुखर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 15 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मितालीच्या प्रशिक्षकाची भूमिका विजय राजने साकारली आहे. मार्च महिन्यातील महिला वर्ल्ड कप स्पर्धा ही मितालीची शेवटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ठरली. क्राइस्टचर्च इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ती शेवटचा सामना खेळली होती. कॅप्टन म्हणून मिताली राजची ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. आता तिचा संपूर्ण प्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये मितालीचा लहानपणापासूनचा संघर्ष पहायला मिळतो. मोठ्या भावाने मारलेल्या चेंडूचा कॅच जेव्हा ती पकडते, तेव्हा तिला ओरडा बसतो. भावाच्या क्रिकेट खेळण्याला कुटुंबीयांचा पाठिंबा असताना प्रशिक्षक मात्र तिच्या आईवडिलांकडे मितालीचं कौतुक करतात. क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात केल्यानंतर तिच्यासमोर असंख्य अडचणी उभ्या राहतात. अगदी टीमची जर्सी आणि सामान्य सुविधा मिळवण्यासाठीही तिला कसा संघर्ष करावा लागतो, ते यात पहायला मिळतंय. सर्वांत महत्त्वाचा म्हणजे या ट्रेलरचा शेवट. पत्रकार परिषदेत मितालीला विचारलं जातं की, तुझा आवडता पुरुष क्रिकेटर कोण? त्यावर ती काय उत्तर देते याची उत्कंठा हा ट्रेलर वाढवतो.

पहा ट्रेलर-

मितालीचं कौतुक करताना तापसीने याआधी म्हटलं होतं, “असे क्रिकेटर्स आहेत ज्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत, असे क्रिकेटर्स आहेत ज्यांचा फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, असेही क्रिकेटर्स आहेत जे तुम्हाला प्रेरणा देतात आणि मग मिताली आहे, जिने हे सर्व तिच्या उत्कृष्ट शैलीच्या जोरावर केलं आणि महिला क्रिकेटचा इतिहास बददला.”

क्रिकेटर्सच्या बायोपिकचं ट्रेंड

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं खूप जुनं आणि खास नातं आहे. क्रिकेटपटूंवरील बायोपिकचा जणू एक ट्रेंड सध्या सुरू झाला आहे. एम. एस. धोनीच्या बायोपिकनंतर क्रिकेटपटूंवरील चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. सर्वात आधी सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री कम बायोपिक आला. ‘सचिन – अ बिलियन ड्रीम्स’ असं या डॉक्युमेंट्रीच नाव होतं. हा बायोपिक प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. मागच्यावर्षी पहिल्या वर्ल्डकप विजयावर ’83 द फिल्म’ हा चित्रपट रिलीज झाला. त्याला सुद्धा प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आता तापसीचा ‘शाब्बाश मिट्ठू’ आणि झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित ‘चकदा एक्प्रेस’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.