
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरू आहे. पण दोन्ही संघांना विजयासाठी खूपच लढत द्यावी लागणार हे स्पष्ट आहे. कारण दोन्ही संघ विजयासाठी तेवढीच मेहनत घेताना दिसत आहेत. मैदानात ऑस्ट्रेलियाचे विकेट पडल्यानंतर जितका आनंद खेळाडू मैदानात करत होते. त्यापेक्षा अधिक आनंद आणि उत्साह प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हावभावात दिसत होता. खेळाडूंच्या प्रत्येक चांगल्या कामगिरीवर टाळ्या वाजवत होता. पण स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यानंतर गौतम गंभीर एकदम रागात दिसला. तसेच नियंत्रण सुटल्याने शिव्या देऊ लागल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे.भारतासमोर ऑस्ट्रेलियापेक्षा ट्रेव्हिस हेडचं मोठं संकट होतं. या संकटाची प्रचिती दोन आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाला आली आहे. त्यामुळे त्याची विकेट पडल्यानंतर सहाजिकच गौतम गंभीर आनंद व्यक्त केला. तेव्हा दोन्ही हात वर करत टाळ्या वाजवल्या. पण स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काही भलतीच होती. बसल्या बसल्या त्याने एक दोन शिव्या हासडल्या.
पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर आलं आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने 96 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. यावेळी त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. पण मोहम्मद शमीच्या फुलटॉस चेंडूवर विकेट देऊन बसला. खरं तर या चेंडूवर बाद होण्यासारखं काही नव्हतं. पण अंदाज आणि खेळण्याचा प्रकार चुकला आणि विकेट देऊन बसला. यावेळी विराट कोहलीलाही हसू आलं.
Please hesitate Gambhir bhai 😁
Gautam gambhir purani yade taja karte huye 😂#INDvsAUS Maxwell “Travis Head”
Shami Varun #ViratKohli𓃵 pic.twitter.com/w53TysZDHT— Dr Vivek Pandey (@Vivekpandey21) March 4, 2025
ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांचा खेळ पूर्ण केला नाही. भारतीय गोलंदाजांनी 49.3 षटकात 264 धावांवर असातना संपूर्ण संघाला तंबूत पाठवलं. स्टीव्ह स्मिथने 73 धावा केल्या. तसेच एलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तर ट्रेव्हिस हेडने 33 चेंडूत 39 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येक दोन विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.