
मुंबई: एखाद्या गोलंदाजाचा दिवस असेल, तर तो काय करु शकतो? हे इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेल्या ‘द हण्ड्रेड‘ स्पर्धेत दिसून आलं. ‘द हण्ड्रेड’ (The hundread) स्पर्धेत 100 चेंडू टाकले जातात. साउदर्न ब्रेव आणि वेल्स फायर या दोन संघांमध्ये सामना होता. या सामन्यात एका गोलंदाजासमोर सर्वच फलंदाजांनी नांगी टाकली. त्याच्यासमोर सगळेच फलंदाज शुन्यावर आऊट झाले. तुम्ही म्हणालं, य़ा सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेल्स फायरने (Wells Fire) 129 धावा केल्या आणि साउदर्न ब्रेवने लक्ष्याचा पाठलाग करताना 132 धावा केल्या. पण फलंदाज शुन्यावर कसे आऊट झाले? इथे सर्व फलंदाज शुन्यावर आऊट होण्याचा अर्थ एका गोलंदाजाशी आहे, त्याने ज्या फलंदाजांना बाद केलं, ते सर्व शुन्यावर आऊट झाले.
इंग्लंडचा 25 वर्षांचा ऑलराऊंडर जॉर्ज गार्टनबद्दल बोलतोय. साउदर्न ब्रेव कडून खेळताना जॉर्जने वेल्स फायरच्या जितक्याही विकेट काढल्या, ते सर्व फलंदाज शुन्यावर बाद झाले.
जॉर्ज गार्टनने या सामन्यात एकूण 15 चेंडू टाकले. या 15 चेंडूत सामन्याचा निर्णयही झाला. या 15 चेंडूत गार्टनने वेल्स फायरच्या टॉप ऑर्डरला डग आऊट मध्ये पाठवलं. फक्त 7 धावा देऊन त्याने हे काम केलं.
जॉर्ज गार्टनने जेकॉब बेथेलला दुसऱ्या चेंडूवर बाद करुन पहिला विकेट घेतला. त्यानंतर वेल्स फायरचा कॅप्टन जोश कॉबला शुन्यावरच त्याने क्लीन बोल्ड केलं. 7 व्या चेंडूवर बेन डकेटच्या यष्ट्या उद्धवस्त केल्या. जॉर्जने ज्या तीन फलंदाजांना बाद केलं, त्यांना खातही उघडता आलं नाही.