Glenn Phillips Century: ग्लेन फिलिप्सने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रचला इतिहास, असं 18 वर्षानंतर घडलं

इंग्लंड न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना लंडनच्या केनिंगस्टन ओव्हल मैदानात होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 391 धावांची खेळी केली. यात ग्लेन फिलिप्सचं शतक खास ठरलं. त्याच्या शतकामुळे दोन विक्रमांची नोंद झाली आहे.

Glenn Phillips Century: ग्लेन फिलिप्सने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रचला इतिहास, असं 18 वर्षानंतर घडलं
Glenn Phillips Century: ग्लेन फिलिप्सने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रचला इतिहास, असं 18 वर्षानंतर घडलं
Image Credit source: New Zealand cricket Twitter
| Updated on: Jun 18, 2026 | 6:08 PM

England vs New Zealand, 2nd Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरूवात काही खास झाली नाही. संघाच्या 14 धावा असताना डेवॉन कॉनवे बाद झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या. 188 धावा असताना 5 गडी तंबूत होते. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव 250 धावात गुंडाळला जाईल असं वाटलं होतं. पण ग्लेन फिलिप्स मैदानात आला आणि त्याने या सामन्याचं चित्र बदललं. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने शतक ठोकलं आणि संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. ग्लेन फिलिप्सने कठीण टप्प्यात हे शतक ठोकल्याने खास ठरलं आहे. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये 18 वर्षानंतर असं पाहायला मिळालं. चला जाणून घेऊयात हे शतक खास का आहे ते..

ग्लेन फिलिप्सच्या कसोटी शतकाची खासियत

ग्लेन फिलिप्सचं कसोटी क्रिकेटमधील शतक दोन कारणामुळे विशेष ठरलं आहे. कारण त्याने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. त्याने 133 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यात 18 चौकार मारले. न्यूझीलंडसाठी सातव्या क्रमांवर उतरून शतकी खेळीचा विक्रम 18 वर्षानंतर घडला आहे. इंग्लंडमध्ये सातव्या क्रमांकावर उतरून शतकी खेळी केली आहे. यापूर्वी 2008 मध्ये जॅकब ओरमने लॉर्ड्स मैदानात अशी कामगिरी केली होती. इंग्लंडमध्ये सातव्या क्रमांकावर उतरून आतापर्यंत चार न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शतक ठोकलं आहे. 1973 मध्ये विक पोलार्ड, 1986 मध्ये जॉन ब्रेसवेल, 2008 मध्ये जॅकब ओरम आणि आता ग्लेन फिलिप्सने ही कामगिरी केली आहे.

ग्लेन फिलिप्सने अशी कामगिरी केली

ग्लेन फिलिप्सने टॉम ब्लंडेलसोबत सहाव्या विकेटसाठी 89 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. यात ब्लंडेलने 38 चेंडूत 17 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने 52 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. त्यानंतर नाथन स्मिथसोबत त्याची भागीदारी फक्त 17 धावांची झाली. नाथन बाद झाल्यानंतर आठव्या विकेटसाठी कायल जेमिसन आणि ग्लेन फिलिप्सने 87 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे 350 पार होण्यास मदत झाली. मॅट हेन्री आणि ग्लेनने नवव्या विकेटसाठी 24 धावा केल्या. पण मॅट हेन्री 5 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर चार चेंडूत ग्लेन फिलिप्सची विकेट पडली.

Follow Us