Rohit Sharma : मी तुला…, क्रिकेटच्या देवाची रोहित शर्मासाठी खास पोस्ट, सचिनने काय म्हटलं?

Sachin Tendulkar Social Media Post For Rohit Sharma : सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलंय. दोघांच्या एकमेकांसह अनेक आठवणी आहेत. विशेष म्हणज सचिननेच रोहितला त्याच्या कसोटी पदार्पणावेळी कॅप दिली होती. त्याच रोहितच्या निवृत्तीनंतर सचिनने भावूक पोस्ट केली आहे.

Rohit Sharma : मी तुला..., क्रिकेटच्या देवाची रोहित शर्मासाठी खास पोस्ट, सचिनने काय म्हटलं?
Sachin Tendulkar And Rohit Sharma
Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2025 | 8:14 PM

टीम इंडियाचा स्फोटक सलामवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याने टी 20i नंतर आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला आहे.रोहितने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय सोशल मीडियावरुन जाहीर केला आहे. रोहित आता वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे. रोहितने इंग्लंड दौऱ्याआधी असा निर्णय घेतल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. रोहितच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला कसोटी संघासाठी कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. अशात क्रिकेटचा देव आणि टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने रोहितसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

सचिनची रोहितसाठी एक्स पोस्ट

सचिनने रोहितसाठी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. सचिनने या पोस्टमध्ये रोहितचा एक फोटो शेअर आहे. सचिनने या पोस्टद्वारे रोहितसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

“मी तुला 2013 साली ईडन गार्डन्सवर टेस्ट कॅप दिली होती. तसेच मी तुझ्यासोबत वानखेडे स्टेडियमच्या बालकनीत उभा राहिलो होतो हे मला आठवतंय. तुझा प्रवास खूप उल्लेखनीय राहिला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत तू एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम योगदान दिलं आहेस. रोहित, तुझ्या कसोटी कारकिर्दीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा”, अशा शब्दात सचिनने रोहित शर्मा सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

सचिनकडून रोहितला डेब्यू कॅप

रोहित शर्मा याने 2013 साली ऐतिहासिक ईडन्स गार्डन्समध्ये कसोटी पदार्पण केलं. रोहितला वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यातून टेस्ट डेब्यू करण्याची संधी मिळाली. तेव्हा सचिन तेंडुलकर याने रोहितला टेस्ट कॅप दिली होती. परंपरेनुसार युवा खेळाडूला पदार्पणावेळी संघातील अनुभवी खेळाडूकडून कॅप दिली जाते. विशेष बाब म्हणजे सचिनने विंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. सचिनने 16 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटी क्रिकटमधून निवृत्ती घेतली होती.

सचिनची रोहितसाठी खास पोस्ट

विराटच्या राजीनाम्यानंतर नेतृत्व

विराट कोहली याने जानेवारी 2022 मध्ये कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहितला 2022 साली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहितने टीम इंडियाचं 24 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. रोहितने त्यापैकी 12सामन्यांमध्ये भारताला विजयी केलं. रोहितसेनेला 9 वेळा पराभूत व्हावं लागलं तर 3 सामने अनिर्णित राहिले होते.