GT vs CSK IPL 2023 Final : 29 मे ला फायनल हे धोनीसाठी खराब नशीबाच लक्षण? तारखांचा योगायोग देतायत वाईट संकेत

| Updated on: May 29, 2023 | 10:25 AM

GT vs CSK IPL 2023 Final : दुसऱ्याबाजूला 29 मे ही तारीख हार्दिक पांड्या आणि त्याच्या टीमसाठी खूप स्पेशल आहे. 2011 साली 28 मे रोजी CSK साठी काय घडलेलं? ते जाणून घ्या.

GT vs CSK IPL 2023 Final : 29 मे ला फायनल हे धोनीसाठी खराब नशीबाच लक्षण? तारखांचा योगायोग देतायत वाईट संकेत
GT vs CSK IPL 2023 Final (2)
Image Credit source: IPL
Follow us on

अहमदाबाद : IPL 2023 ची फायनल 28 मे रोजी होती. पण आता हा सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. पावसामुळे हा सामना रिझर्व्ह डे ला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. पाऊस काल संध्याकाळी सुरु झाला, तो थांबलाच नाही. त्यामुळे काल फायनल मॅच होऊ शकली नाही. आता फायनल सामना 29 मे रोजी होणार, हा एक अजब योगायोग आहे. कदाचित एमएस धोनीला नशिबाची साथ नाहीय, असं सुद्धा काहीजण म्हणतायत.

आम्ही असं का म्हणतोय? असा तुम्ही विचार कराल. गुजरात टायटन्स टीमच 29 मे या तारखेशी खास कनेक्शन हे त्यामागे कारण आहे. ही तारीख हार्दिक पांड्या आणि त्याच्या टीमसाठी खास आहे. 28 मे ही तारीख धोनीसाठी खास होती, तशीच 29 मे हार्दिकसाठी स्पेशल आहे.

28 मे ला फायनल झाली असती, तर सीएसकेसाठी चांगलं ठरल असतं

28 मे रोजी होणाऱ्या फायनलआधी अनेक क्रिकेट पंडितांनी चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपदाच दावेदार म्हटलं होतं. प्रत्येकाच आपलं एक कारण होतं. पण CSK च 28 तारखेशी एक कनेक्शन आहे. याच तारखेला 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच विजेतेपद मिळवलं होतं. त्यांनी टायटल डिफेंड केलं होतं. अशी कामगिरी करणारा चेन्नई पहिला संघ ठरला होता.

29 मे रोजी धोनीच नशीब खराब असू शकतं

IPL 2023 ची फायनल आता 29 मे रोजी खेळली जाणार आहे. याच तारखेला मागच्यावर्षी गुजरात टायटन्स पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली होती. त्यांनी राजस्थान रॉयल्सला नमवून आयपीएल 2022 चा किताब जिंकला होता. महत्वाच म्हणजे ही मॅच अहमदाबादच्या मैदानातच झाली होती. याच मैदानावर आज फायनल होणार आहे.

तारखांचा योगायोग

तारखांचा योगायोग आणि नशिबाचा विचार केल्यास, 29 मे रोजी हार्दिक पांड्याच पारड जड वाटतय. कारण गुजरातने ज्या तारखेला किताब जिंकला, त्याच मैदानात डिफेंड करण्याची संधी आहे. 29 मे रिझर्व्ह डे आहे. आज मॅच झाली नाही, तर गुजरात टायटन्सला विजेता म्हणून जाहीर केलं जाईल.