GT vs LSG IPL 2022: आज ठरणार प्लेऑफमध्ये पहिलं कोण पोहोचणार? गुजरातची खराब सुरुवात

आतापर्यंत फॉर्ममध्ये असलेला गुजरातचा संघ हळूहळू सूर हरवत चाललाय असं दिसतय. मागच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा करता आल्या नव्हत्या.

GT vs LSG IPL 2022: आज ठरणार प्लेऑफमध्ये पहिलं कोण पोहोचणार? गुजरातची खराब सुरुवात
हार्दिक पांड्या
Image Credit source: tv9
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 10, 2022 | 8:29 PM

मुंबई: IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये कुठला संघ दाखल होणार, त्याचा निर्णय आज 10 मे रोजी होईल. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्समध्ये (LSG vs GT) सामना सुरु आहे. पॉइंटस टेबलमध्ये लखनौ पहिल्या, तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे समान 16 पॉइंटस आहेत. या सामन्यात गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधला आजचा 57 वा सामना आहे. लखनौ आणि गुजरात या दोन्ही टीम्सनी यंदा आयपीएलमध्ये डेब्यु केलाय. आज जो संघ जिंकेल, तो प्लेऑफमध्ये सर्वप्रथम दाखल होईल. आजच्या लढतीआधी दोन्ही टीम्सनी संघात बदल केले आहेत.

गुजरातचा आत्मविश्वास डळमळीत झाला?

आतापर्यंत फॉर्ममध्ये असलेला गुजरातचा संघ हळूहळू सूर हरवत चाललाय असं दिसतय. मागच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा करता आल्या नव्हत्या. आजच्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याताही सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 10 ओव्हर्समध्ये 59 धावात गुजरातच्या 3 विकेट गेल्यात. सलामीवीर वृद्धीमान साहा (5), मॅथ्यू वेड ( 10) आणि कॅप्टन हार्दिक पंड्या (11) धावांवर बाद झाले. खरंतर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात गुजरातचा संघ संतुलित आहे. पण मागच्या दोन-तीन सामन्यांपासून त्यांच्या खेळात ती आश्वसकता दिसत नाहीय.

लखनौने केला मोठा बदल

लखनौने रिटेन केलेला खेळाडू रवी बिश्नोईला बाहेर बसवलं आहे. त्याच्याजागी 23 वर्षांचा स्पिन-ऑलराऊंडर करण शर्माला संधी दिलीय. गुजरातनेही आपल्या संघात तीन मोठे बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, साई सुदर्शन आणि प्रदीप सांगवान यांना बाहेर बसवलय. त्यांच्याजागी यश दयाल, मॅथ्यू वेडला संघात स्थान दिलय. साई किशोरला या सीजनमध्ये पहिल्यांदा संधी मिळालीय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें