
आयपीएल 2025 स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ भिडणार आहेत. मुंबई इंडियन्सची कामगिरी मागच्या पर्वात निराशाजनक राहिली होती. तर गुजरात टायटन्सही मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. तर गुजरात टायटन्सने एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. एलिमिनेटर सामन्यात करो मरोची लढाई आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर थेट स्पर्धेतून आऊट होणार आहे. त्यामुळे दोन्ही विजयासाठी तितकीच ताकद लावतील. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. यात गुजरात टायटन्सचं पारडं जड दिसत आहे. गुजरातने पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर मुंबई इंडियन्स फक्त दोन सामने जिंकली आहे.
यंदाच्या पर्वात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स साखळी फेरीत दोनदा भिडले होते. दोन्ही वेळेस गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला लोळवलं आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 196 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तर मुंबई इंडियन्सचा डाव 160 धावांवर आटोपला. गुजरातने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे हे लक्ष 147 धावांचं करण्यात आलं. तसेच एक षटक कमी करण्यात आलं होतं. गुजरात टायटन्सने 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेत 147 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. या पर्वात दोन्ही संघ तिसऱ्यांदा भिडणार आहेत.
मुंबई इंडियन्स : जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, चरित असलंका, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, जेराल्ड कोएत्झी, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.