… तर बऱ्याच गोष्टी सुटतील! हरभजन सिंगने श्रीसंतची रुममेट म्हणून केली निवड, बॉक्सिंग चॅलेंजनंतर नवा ट्विस्ट

हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील वाद काही केल्या शमताना दिसत नाही. मधल्या काळात दोघांमध्ये सलोखा झाल्याचं दिसून आलं होतं. पण हरभजन सिंगच्या एका वक्तव्यानंतर एस श्रीसंत पुन्हा चिडला होता. आता हरभजन सिंगचं एक नवं वक्तव्य समोर आलं आहे.

... तर बऱ्याच गोष्टी सुटतील! हरभजन सिंगने श्रीसंतची रुममेट म्हणून केली निवड, बॉक्सिंग चॅलेंजनंतर नवा ट्विस्ट
... तर बऱ्याच गोष्टी सुटतील! हरभजन सिंगने श्रीसंतची रुममेट म्हणून केली निवड, बॉक्सिंग चॅलेंजनंतर नवा ट्विस्ट
Image Credit source: TV9 Network/Gujrati
| Updated on: Aug 13, 2026 | 6:10 PM

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सहकारी असलेल्या हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील वाद इतके वर्षे सरूनही संपलेला नाही. आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंगने एस श्रीसंतच्या कानशि‍लात लगावली होती. तेव्हा हा वाद बराच पेटला होता. मतभेद होऊनही वनडे वर्ल्डकप 2011 संघात दोघेही होते. विजेत्या संघात त्यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद काही वर्षे शांतही झाला. पण ललित मोदी यांनी कथित व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामंजस्यपणे हे प्रकरण सोडवल्याचं दिसून आलं. पण हरभजन सिंगच्या एका जाहिरातीनंतर एस श्रीसंत पुन्हा चिडला. त्याने हरभजन सिंगला थेट बॉक्सिंग रिंगमध्ये उतरून मतभेद मिटवण्याचं आव्हान देऊन टाकलं. दुसरीकडे, हरभजन सिंगने मागचं काय झालं ते विसरून पुढे जाण्याचे संकेत दिले. तसेच एकत्र वेळ घालवला तर मतभेद मिटू शकतात असंही सांगितलं.

श्रीसंतबाबत हरभजन सिंग काय म्हणाला?

हरभजन सिंगने पीटीआयशी बोलताना विश्वास व्यक्त केला की, दोन्ही सहकाऱ्यांना एकत्र ठेवलं तर गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकते. ‘जर आम्ही दोघे एकाच खोलीत असू तर बऱ्याच गोष्टी सुटतील. मी त्या दृष्टीकोनातून पाहात आहे. तुम्ही त्याला माझा रुममेट म्हणून निवडू शकता. मला काहीच अडचण नाही.’ हरभजन सिंगने या चर्चेदरम्यान श्रीसंत आणि त्याचा बॉक्सिंग ग्लव्ह्ज घातलेला फोटोही दाखवला.

श्रीसंतने काय आव्हान दिलं होतं?

हरभजन सिंगने व्यावसायिक जाहिरातीत ‘थप्पड प्रकरणाचा’ संदर्भ वापरून अभिनय केला होता.
हरभजन सिंगने केलेल्या जाहिरातीनंतर श्रीसंत थेट म्हणाला होता की, ‘हाच सीन, तुझ्यात हिम्मत आहे का? माझ्यासोबत रिंगमध्ये येण्याची हिम्मत आहे का? तू सही करून येऊ शकतोस का? येऊ शकतोस का? मी त्याला विचारतोय. माझ्यासोबत रिंगमध्ये येण्याची हिम्मत आहे का? हेच ग्लोव्हज घालून… हा अभिनय नाही, मी हसतोय. तू तर हसतही नाहीयेस, मला कळत नाहीये तू काय करतोयस. बघूया. हे एक खुलं आव्हान आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us