AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel : एअरटेलच्या युजर्सचा करेक्ट कार्यक्रम, ग्राहकांना मोठा धक्का, 4 रिचार्ज…

Airtel Prepaid Plans : एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनाने 4 महत्त्वाचे रिचार्ज प्लॅन बंद केले आहे. यामुळे आता ग्राहकांना महागडे प्लॅन खरेदी करावे लागणार आहेत.

Airtel : एअरटेलच्या युजर्सचा करेक्ट कार्यक्रम, ग्राहकांना मोठा धक्का, 4 रिचार्ज...
Airtel Remove 4 recharge planImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 13, 2026 | 6:01 PM
Share

एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही दिसत नाहीत. कंपनीने 12 ऑगस्ट 2026 पासून देशभरातील हे चार प्लॅन हटवले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कंपनीने प्लॅन का बंद केले?

अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या वेळोवेळी आपला प्रति ग्राहकामागील नफा वाढवण्यासाठी आणि नेटवर्क टॅरिफचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या प्लॅनमध्ये बदल करत असतात. बंद करण्यात आलेले हे चारही प्लॅन 28 दिवसांपासून 84 दिवसांपर्यंतच्या व्हॅलिडिटीसह येत होते. यामध्ये दररोज 1.5GB ते 2GB डेटा मिळत होता. हे प्लॅन हटवल्यानंतर एअरटेलचा उद्देश आपल्या प्लॅनची यादी अधिक सोपी करणे आणि ग्राहकांना वेगवेगळ्या डेटा लिमिट किंवा डिजिटल बेनिफिट्स असलेल्या रिचार्ज पर्याय देणे असा असू शकतो.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

299 रुपयांचा प्लॅन बंद झाल्यामुळे दर महिन्याला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा वापरणाऱ्या ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. अनेक ग्राहकांसाठी हा प्लॅन पहिली पसंती होता. त्याचप्रमाणे 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या मिड-टर्म प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाही आता रिचार्जसाठी आपले बजेट वाढवावे लागू शकते. अशा प्रकारे कंपनीने थेट प्लॅनच्या किमती वाढवल्या नसल्या तरी ग्राहकांचा रिचार्जवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोबाइल ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) येत्या काही महिन्यांत आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड टॅरिफ प्लॅनच्या किमतींमध्ये 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत आहेत, याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट