AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी! पहिल्या स्थानासाठी हार्षित राणाची या खेळाडूला पसंती

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. या संघात हार्षित राणाची निवड झाली आहे. एकीकडे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह असताना त्याने जसप्रीत बुमराह गोलंदाजीला गुण दिलेत. तसेच दुसऱ्या स्थानी ठेवलं आहे.

जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी! पहिल्या स्थानासाठी हार्षित राणाची या खेळाडूला पसंती
जसप्रीत बुमराह गोलंदाजीत दुसऱ्या स्थानी! पहिल्या स्थानासाठी हार्षित राणाची या खेळाडूला पसंतीImage Credit source: PTI
| Updated on: Aug 21, 2025 | 10:28 PM
Share

क्रिकेटविश्वात सध्याच्या काळात जसप्रीत बुमराह सर्वात बेस्ट गोलंदाज गणला जातो. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा दबदबा आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना त्याची धास्ती लागून असते. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजीतून हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. पण हार्षित राणाला तसं वाटत नाही. नुकतंच दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने याबाबत सांगितलं. या स्पर्धेत खेळताना एक मजेशीर ब्लाइंग रँकिंग गेममध्ये त्याने भाग घेतला. यावेळी त्याला सहा गोलंदाजांना रँकिंग द्यायची होती. तेव्हा जसप्रीत बुमराहला त्याने दुसऱ्या स्थानावर ठेवलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ दिल्ली प्रीमियर लीगच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला आहे. अँकर शेफाली बग्गाने त्याला भारतीय गोलंदाजांचे नाव न बघता रँकिंग करण्यास सांगितलं.

सर्वात प्रथम जसप्रीत बुमराह आला तेव्हा त्याला त्याने दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा आणि त्याचा जोडीदार वरूण चक्रवर्तीचं नाव आलं. त्याला त्याने सहाव्या क्रमांकावर ठेवलं. अक्षर पटेलला चौथ्या स्थानावर ठेवलं. त्यानंतर अर्शदीप सिंगला तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं. त्यानंतर पाचव्या क्रमांकासाठी प्रसिद्ध कृष्णाला पसंती दिली. त्यानंतर कुलदीप यादवचं नाव आलं. तेव्हा त्याने त्याला पहिला नंबर दिला. कुलदीप यादवला पहिल्या नंबर दिल्यानंतर त्याने सांगितलं की, ‘कुलदीप भावा, यासाठी मी तुझ्याकडून काहीतरी घेईन. तुला नंबर 1 केलं आहे.’

आशिया कप स्पर्धेत हार्षित राणा खेळणार

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हार्षित राणाची निवड झाली आहे. पण त्याचं नाव या यादीत येतात टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. माजी क्रिकेटपटूंच्या मते त्याच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णा योग्य उमेदवार होता. कारण हार्षित फॉर्म काही चांगला नाही. दरम्यान, हार्षित राणा दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सकडून खेळत असून कर्णधार आहे. त्याने 19.18 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?