Harshit Rana : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान हर्षित राणाचं ऑपरेशन, रिकव्हर होऊन आयपीएल खेळेल की नाही?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या तोंडावर हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेतून आऊट झाला. त्याच्या जागी संघात मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. पहिल्याच सामन्यात कमाल गोलंदाजी केली. असं असताना हर्षितवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

Harshit Rana : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान हर्षित राणाचं ऑपरेशन, रिकव्हर होऊन आयपीएल खेळेल की नाही?
वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान हर्षित राणाचं ऑपरेशन, रिकव्हर होऊन आयपीएल खेळेल की नाही?
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 09, 2026 | 5:10 PM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यातून सावरणं कठीण होतं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला. त्यामुळे गेलं वर्षभर केलेली त्याची मेहनत एका झटक्यात वाया गेली. तर मोहम्मद सिराजला नशिबाने साथ दिली. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याला गोलंदाजी करताना वेदना होत होता. त्याने या सामन्यात फक्त एकच षटक टाकलं. पण दोन वेळेस गोलंदाजी करताना थांबला आणि वेदना असह्य झाल्याचं दिसून आलं. असं असताना हर्षित राणाच्या गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली आहे. त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला फोटो शेअर करताना त्याने तब्येतीबाबत माहिती दिली. इतकंच काय तर पुढचं मिशन काय आहे हे देखील सांगून टाकलं.

हर्षित राणाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत सांगितलं की, शस्त्रक्रिया य़सस्वीरित्या पार पडली आहे. तसेच पुढे दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचं सांगितलं. पहिलं म्हणजे लवकरात लवकर बरं व्हायचं आणि दुसरं टीम इंडियात पुनरागमन करायचं. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी हर्षित राणा चांगला फॉर्मात होता. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता. कारण हर्षित फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देण्यास सक्षम होता. त्यामुळे स्पर्धेला मुकल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.  हर्षित राणा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो.

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरही जखमी झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेला मुकला होता. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फिट अँड फाईन होईल असं सांगण्यात आलं होतं. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात काही संघात आला नाही. आता दिल्लीत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात रुजू होईल असं सांगण्यात येत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता स्पर्धा सुरू असताना कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होऊ नये यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत