AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : इटलीच्या फलंदाजाने रचला इतिहास, विजय मात्र स्कॉटलँडच्या पारड्यात

ITA vs SCO: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता पुढे सरकत आहे. प्रत्येक सामन्यानंतर स्पर्धेचं चित्र बदलताना दिसत आहे. इटली आणि स्कॉटलँड यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सामना पार पडला. या सामन्यात स्कॉटलंडने इटलीला पराभवाचं पाणी पाजलं.

T20 WC 2026 : इटलीच्या फलंदाजाने रचला इतिहास, विजय मात्र स्कॉटलँडच्या पारड्यात
T20 WC 2026 : इटलीच्या फलंदाजाने रचला इतिहास, विजय मात्र स्कॉटलँडच्या पारड्यातImage Credit source: PTI
| Updated on: Feb 09, 2026 | 4:11 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सातव्या सामन्यात इटली आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इटलीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. कारण स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ 16.4 षटकात 134 धावांवर गारद झाला. हा सामना स्कॉटलँडने 73 धावांनी जिंकला. हा सामना स्कॉटलँडने जिंकला असली तरी इटलीच्या फलंदाजाने एका विक्रमाची नोंद केली आहे. 28 वर्षीय बेंजामिन मॅनेटी हा इटलीकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इटलीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून बेंजामिन मॅनेटी याच्या नावाची नोंद झाली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इटली संघाचे 3 विकेट हे 40 धावांवर पडले होते. त्यानंतर बेंजामिन मॅनेटी फलंदाजीला उतरला. त्याने 31 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकात मारत 52 धावांची खेोळी केली. त्याला त्याचा भाऊन हॅरी मॅनेटीची साथ मिळाली. हॅरी मॅनेटीने 25 चेंडूत 148 च्या स्ट्राईक रेटने 37 धावा केल्या. यात तीन षटकारांचा समावेश होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 45 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटली आणि इटलीचा डाव पत्त्यासारखा कोसळला. खाली आलेल्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

इटलीचा उपकर्णधार हॅरी मॅनेटी म्हणाला की, ‘मला वाटते जेव्हा तुम्ही २०० धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्ही खूप मेहनत घ्यावी लागेल आणि असे काही वेळा येतील जेव्हा ते बाहेर पडणार नाही आणि विकेट्स पडतील आणि ते उच्च-जोखीम क्रिकेट आहे आणि तेच टी-२० क्रिकेट आहे. आणि जेव्हा तुम्ही स्कॉटलंडसारख्या दर्जेदार संघाविरुद्ध खेळत असता, जे शक्य तितक्या काळ खेळात स्वतःला टिकवून ठेवतात, तेव्हा तुम्ही एक गमावला तर तुम्ही काही लवकर गमावू शकता. म्हणून आम्ही त्या मधल्या काळात भागीदारी बांधण्याचा प्रयत्न करणे आणि मागे काही ताकदीने ते परत आणण्याची आशा करतो हे समजून घेत आहोत.’

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?