अश्विनच्या महानतेवर सवाल उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराला हिटमॅनने गप्प केलं, म्हणाला…

टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेवर क्लीन स्वीप विजय मिळवला आहे. या क्लीन स्वीपमध्ये फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ashwin) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मोहालीपासून बंगळुरूपर्यंत आणि लाल ते गुलाबी चेंडूंत त्याने आपली जादू दाखवली.

अश्विनच्या महानतेवर सवाल उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराला हिटमॅनने गप्प केलं, म्हणाला...
Rohit Sharma (Test)
Image Credit source: VideoGrab
| Updated on: Mar 15, 2022 | 12:47 PM

मुंबई : टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेवर क्लीन स्वीप विजय मिळवला आहे. या क्लीन स्वीपमध्ये फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ashwin) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मोहालीपासून बंगळुरूपर्यंत आणि लाल ते गुलाबी चेंडूंत त्याने आपली जादू दाखवली. बंगळुरूमध्ये पिंक बॉल टेस्ट जिंकल्यानंतर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा एकदा स्वतःच्याच जुन्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली आहे. ‘अश्विन सर्वात महान गोलंदाज आहे’, या वक्तव्याची पुनरावृत्ती करून त्याने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या तोंडाला कुलूप लावण्याचं काम केलं आहे. रोहितने त्याला गप्प केलं आणि त्याचवेळी अश्विनचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढवला.

मोहाली कसोटीनंतर रोहित शर्माने अश्विनचा सर्वकालीन महान गोलंदाजांमध्ये समावेश केला. मोहालीत त्याने कपिल देव यांचा सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम मोडला. त्यानंतर रोहितच्या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफ म्हणाला होता की, कदाचित भारतीय कर्णधाराची जीभ घसरली असेल. पण, बंगळुरूमध्ये रोहितने आपल्या जुन्या वक्तव्याची पुनरावृत्ती करून स्पष्ट केले की त्याची जीभ घसरली नव्हती, तर तो त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे.

रोहित म्हणाला, अश्विनपेक्षा भारी कोणच नाय!

बंगळुरू कसोटी सामना जिंकल्यानंतर हर्षा भोगलेने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रोहितला विचारले की तो अश्विनला सर्वकालीन महान गोलंदाज का म्हणतो? यावर रोहितने उत्तर दिले की, “हा माझा दृष्टिकोन आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला त्याला चेंडू देतो तेव्हा तो मॅच विनिंग परफॉर्मन्स देतो. त्याच्यात अजून खूप क्रिकेट बाकी आहे. येत्या काळात अनेक महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे अश्विन चांगल्या स्थितीत राहील याची काळजी घ्यावी लागेल.”

वक्तव्याची पुनरावृत्ती, रोहितने पाकिस्तानी खेळाडूला गप्प केलं

रोहित शर्माने अश्विनचे ​​सर्वकालीन महान गोलंदाज असे वर्णन केले तेव्हा पाकिस्तानचा रशीद लतीफ म्हणाला होता, “अश्विन एक जबरदस्त गोलंदाज आहे यात शंका नाही. घरच्या परिस्थितीत एसजी बॉलसह अश्विनची कामगिरी पाहिली तर तो भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे यात शंका नाही. तथापि, तो परदेशातील परिस्थितींमध्ये इतका परिपूर्ण नाही आणि मी रोहित शर्माशी सहमत नाही. कदाचित रोहित शर्माची जीभ घसरली असावी.”

अश्विन निःशब्द

आपल्या वक्तव्याची पुनरावृत्ती करून रोहितने पाकिस्तानी खेळाडू रशीद लतीफला गप्प केलं आहे. तसेच रोहित शर्माच्या तोंडून असे शब्द ऐकून अश्विन निःशब्दझाला. तो म्हणाला होता की, “रोहित शर्माला काय बोलू हे मला कळत नाही. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.”

इतर बातम्या

श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे WTC Points Table मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा

IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट

दोन दिवसात ठरणार, हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये खेळणार की, नाही, परीक्षा द्यावीच लागेल