हार्दिक पांड्याचं मन जिंकणारं उत्तर, कार्तिकच्या ट्विटला केलं रिट्विट

| Updated on: Sep 12, 2022 | 9:24 PM

आज टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यात अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. यात दिनेश कार्तिकलाही संधी मिळाली आहे. यावर पांड्यानं उत्तर दिवून मन जिंकलंय.

हार्दिक पांड्याचं मन जिंकणारं उत्तर, कार्तिकच्या ट्विटला केलं रिट्विट
hardik pandya dinesh karthik
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  बीसीसीआयनं (BCCI) आज टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2022) क्रिकेट संघ जाहीर केला आहे. याची क्रिकेटप्रेमी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. यात आता दिनेश कार्तिकलाही संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा टी-20 (T20) विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता.

बीसीसीआयचं ट्विट

एका शब्दानं मन जिंकलं

आयपीएल 2022 मध्ये दमदार खेळामुळे त्याने यावर्षी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले आणि आता त्याची टी-20 वर्ल्ड कपमध्येही निवड झाली आहे. ICC T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून DK ला त्यात स्थान मिळाले आहे. संघात निवड झाल्यानंतर डीकेची प्रतिक्रिया हे आजचे सर्वोत्तम ट्विट आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटवर हृदय पिळवटून टाकणारे उत्तर दिले आहे. एका शब्दाने पांड्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

दिनेश कार्तिकने ट्विटरवर लिहिलंय की, ‘स्वप्न पूर्ण होतंय.’यासोबत त्यानं ब्लू हार्टही टाकलं आहे. आपल्या पोस्टवर कमेंट करताना पांड्यानं ‘चॅम्पियन’ असं लिहिलंय.

हे ट्विट वाचा….

दिनेश कार्तिकचा आयपीएल 2022पासून आतापर्यंतचा प्रवास खूप खास आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने डीकेला विकत घेतले आणि या खेळाडूने फिनिशरच्या भूमिकेत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर त्याला टीम इंडियाच्या भूमिकेतही स्थान देण्यात आले आहे. दिनेश कार्तिकने 2004 मध्ये करिअरला सुरुवात केली. 2007 च्या T20 विश्वचषकानंतर त्याला एकही T20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळालेली नाही.

T20 विश्वचषकसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.