IPL 2022: नारळ पाणी पिऊन Ashish Nehra ने कसा बांधला गुजरातचा ‘चॅम्पियन’ संघ? हे कसं जमवलं ते समजून घ्या…

| Updated on: May 25, 2022 | 2:20 PM

IPL 2022: आशिष नेहराला बरेच लोक गोलंदाज म्हणून ओळखतात. पण नेहराच्या स्वभावाची फार कमी जणांना कल्पना आहे. आशिष नेहरा नेहमीच आनंदात रहाणारा व्यक्ती आहे. त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला टेन्शन दिसणार नाही. तो खेळाकडे खेळ म्हणूनच बघतो.

IPL 2022: नारळ पाणी पिऊन Ashish Nehra ने कसा बांधला गुजरातचा चॅम्पियन संघ? हे कसं जमवलं ते समजून घ्या...
Gujarat Titans Asish Nehra
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: गुजरात टायटन्स हा IPL 2022 मधला नवखा संघ. या टीमकडून फार कोणी अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. गुजरात समोर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स सारख्या मोठ्या संघांच आव्हान होतं. मुंबई आणि चेन्नई या टीम्सनी तर आयपीएलमध्ये राज्य केलंय. पण या सीजनमध्ये गुजरातच्या संघाने कमाल केली. भल्या भल्या दिग्गज संघांना पराभवाचा धक्का देत थेट फायनलमध्ये धडक मारली. गुजरातच हे यश चक्रावून टाकणार आहे. गुजरातच्या टीमने हे यश कसं मिळवलं? असाच प्रश्न अनेकांना पडलाय़. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) सात विकेट राखून विजय मिळवला व थेट फायनलमध्ये धडक मारली. गुजरातच्या आजच्या यशात डेविड मिलर, हार्दिक पंड्या या खेळाडूंचं नाव घेतलं जातय. पण संघाच्या विजयाची खरी स्क्रिप्ट लिहिली, ती आशिष नेहराने. आशिष नेहराने गुजरातच्या टीमची बांधणी कशी केली? आयपीएलमधील एक यशस्वी संघ कसा बनवला ? ते समजून घ्या.

नेहरासारखा दुसरा कोच नाही

आशिष नेहराला बरेच लोक गोलंदाज म्हणून ओळखतात. पण नेहराच्या स्वभावाची फार कमी जणांना कल्पना आहे. आशिष नेहरा नेहमीच आनंदात रहाणारा व्यक्ती आहे. त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला टेन्शन दिसणार नाही. तो खेळाकडे खेळ म्हणूनच बघतो. तो जो विचार करतो, तेच करतो. त्याच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये तुम्हाला कधीच फरक दिसणार नाही. नेहराचा हाच अंदाज आणि व्यक्तीमत्व गुजरात टायटन्सच्या यशाचं एक कारण आहे. आशिष नेहराला क्रिकेट खूप चांगलं कळतं. खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करुन, कसं जिंकायचं ही कला त्याला चांगली ठाऊक आहे. नेहराने कोच म्हणून हेच केलं.

नेहराचं वेगळेपण काय? ते समजून घ्या

ज्या खेळाडूंवर कुठल्याही फ्रेंचायजीने पूर्ण विश्वास ठेवला नव्हता, अशा खेळाडूंना आशिष नेहराने आपल्या प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. नेहराने राहुल तेवतियाला फिनिशरचा रोल दिला. ऑलराऊंडर असलेल्या तेवतियाला नेहराने फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं. डेविड मिलर राजस्थानच्या संघातून खेळताना सलग संधी मिळवी, यासाठी तरसत होता. राहुल तेवतिया गुजराकडे आल्यानंतर त्याला सर्व सामन्यात संधी मिळाली. आज निकाल सर्वांसमोर आहे. यश दयाल आपला पहिला सीजन खेळतोय. नेहराने ओपनिंग गोलंदाजीची जबाबदारी दिली. खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करणं, हे आशिष नेहराचं वैशिष्ट्य आहे.

नेहराने पार्थिव पटेलला शब्द दिला

पार्थिव पटेलने आशिष नेहराच्या या गुणांबद्दल माहिती दिली. आरसीबी, मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या पार्थिव पटेलने सांगितलं की, 2019 मध्ये आशिष नेहरा RCB चे कोच होते. नेहराने त्यावेळी पार्थिव पटेलला उपकर्णधार बनवलं व सर्व सामन्यात संधी देण्याचा शब्द दिला. त्या सीजनमध्ये पार्थिवने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. पार्थिवसाठी तो बेस्ट सीजन होता. पण 2019 मध्ये आरसीबीने खूप खराब कामगिरी केली. त्यांचा संघ शेवटच्या स्थानावर होता. त्यामुळे नेहराला कोच पदावरुन हटवण्यात आलं.

आशिष नेहरा दुसऱ्या कोचेसपेक्षा वेगळा कसा?

आशिष नेहरा आयपीएलमधल्या दुसऱ्या कोचपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. दुसरे कोचेस लॅपटॉप आणि सपोर्ट स्टाफसोबत आकडंयाच्या गणितात गुंतलेले तुम्हाला दिसतात. पण नेहरा तुम्हाला सामन्यादरम्यान मजा-मस्ती करताना दिसतो. तो लॅपटॉपचा वापर करत नाही. त्याच्या हातात काही नसतं. आशिष नेहरा तुम्हाला नेहमी सीमारेषेजवळ फिरताना दिसतो. नेहराला आकड्यांशी काही देणं-घेणं नाही, प्रत्येकदिवशी काहीतरी वेगळं होणार, हे त्याला माहित असतं.