AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 वर्ष भाव दिला नाही, त्याच टीमला दाखवून दिली जागा, कोणी खरेदी करत नव्हतं, पण आज तोच IPL चा मोठा स्टार

IPL मध्ये कधी, कुठला खेळाडू किंवा टीम चमकून जाईल, कमाल करेल, याचा भरवास नसतो. या स्पर्धेत मोठ-मोठे खेळाडू, संघ संघर्ष करताना दिसतायत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat titans-Lucknow super giants) हे दोन या स्पर्धेतील नवखे संघ.

2 वर्ष भाव दिला नाही, त्याच टीमला दाखवून दिली जागा, कोणी खरेदी करत नव्हतं, पण आज तोच IPL चा मोठा स्टार
गुजरात टिटन्स आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानीImage Credit source: IPL
| Updated on: May 25, 2022 | 1:13 PM
Share

मुंबई: IPL मध्ये कधी, कुठला खेळाडू किंवा टीम चमकून जाईल, कमाल करेल, याचा भरवास नसतो. या स्पर्धेत मोठ-मोठे खेळाडू, संघ संघर्ष करताना दिसतायत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat titans-Lucknow super giants) हे दोन या स्पर्धेतील नवखे संघ. त्यांनी या सीजनमध्ये डेब्यु केला. या दोन्ही टीम्स प्लेऑफ, फायनलपर्यंत धडक मारतील, याची कोणी कल्पना केली नव्हती. सुरुवातीला असा दावा करणारे फार कमी जण असतील. पण आजचं हे वास्तव आहे. या दोन्ही टीम्सनी आज कमाल केलीय. खेळाडूंच्या बाबतीतही तसंच आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरचच (David Miller) उदहारण घ्या. आज हा खेळाडू आयपीएलमध्ये स्टार बनलाय. कालच्या राजस्थान विरुद्धच्या खेळाने त्याचं नशीब पालटलं. या स्फोटक फलंदाजाने क्वालिफायर 1 च्या सामन्यात आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं.

आपण किती मोठी चूक केली, ते राजस्थानला आता कळलं असेल

मिलरने 38 चेंडूत नाबाद 68 धावांची धडाकेबाज खेळी केली. गुजरात टायटन्ससाठी आज तो स्टार खेळाडू आहे. मिलरची ही इनिंग जास्त खास यासाठी आहे, कारण त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध ही स्फोटक फलंदाजी केली. मागचे दोन सीजन तो, याच राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचा. राजस्थान रॉयल्सने डेविड मिलरला 2020 मध्ये विकत घेतलं. पण त्याला पुरेशी संधी दिली नाही. 2020 मध्ये अवघ्या एका सामन्यात त्यानंतर पुढच्यावर्षी 2021 मध्ये नऊ मॅचेसमध्ये संधी दिली. म्हणजे दोन सीजनमध्ये राजस्थानने मिलरला फक्त 10 सामन्यात संधी दिली. मिलरलाही आपल्या क्षमतेला साजेसा खेळ दाखवता आला नव्हता. राजस्थानकडून खेळताना त्याने फक्त 124 धावा केल्या होत्या. राजस्थानने मेगा ऑक्शनआधी त्याला रिलीज केलं.

मेगा ऑक्शनमध्ये पण कोणी बोली लावली नव्हती

डेविड मिलर आज मोठा स्टार बनलाय. पण फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला आणखी एका कटू अनुभवाला सामोरं जावं लागलं. ऑक्शनच्या पहिल्या राऊंडमध्ये कुठल्याही फ्रेंचायजीने मिलरवर बोली लावली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये गुजरात टायटन्सने त्याच्यावर 3 कोटी रुपयांची बोली लावली. या निर्णयाचा आज गुजरातला फायदा होतोय. या सीजनमध्ये डेविड मिलरने 15 सामन्यात 64 च्या सरासरीने 141 च्या स्ट्राइक रेटने 449 धावा केल्या आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.