T20 World Cup 2024 : T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मोठ्या संकटात, बार्बाडोसमध्ये काय घडलं?

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय. पण आता ते अडचणीत सापडले आहेत. टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. रिपोर्ट्सनुसार, जय शाह टीम इंडियाच्या आधी भारतात परतणार होते.

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मोठ्या संकटात, बार्बाडोसमध्ये काय घडलं?
Team India Won T20 World Cup 2024
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 02, 2024 | 8:01 AM

बार्बाडोसच्या केंसिग्टन ओवल मैदानात टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय. बार्बाडोसची भूमी फक्त टीम इंडियाच नाही, त्यांच्या प्रत्येक चाहत्यासाठी खास बनलीय. याच बार्बाडोसमध्ये रोहित अँड कंपनीवर संकट कोसळलय. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली आहे. याच कारण आहे, वादळ. बार्बाडोसला चक्रीवादळाने धडक दिली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू हॉटेल रुममध्ये कैद आहे. वादळामुळे बार्बाडोसमधली वीज आणि पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एअर ट्रॅफिकही बंद आहे. रिपोर्ट्सनुसार बार्बाडोसमधून प्रत्येक उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

भारतीय टीम बार्बाडोसमध्ये फसली आहे. तिथून कधी परतणार? याची अजूनपर्यंत ठोस माहिती मिळालेली नाही. फक्त खेळाडूच नाही, बीसीसीआय सचिव जय शाह सुद्धा बार्बाडोसमध्ये आहेत. रिपोर्ट्सनुसार, जय शाह टीम इंडियाच्या आधी भारतात परतणार होते. पण बार्बाडोसमधील हवामान बदलल्यानंतर त्यांनी टीम सोबत तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

तिथल्या पत्रकारांनी काय माहिती दिली?

वेस्ट इंडिज दौऱ्यावर वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी गेलेले परदेशी आणि भारतीय पत्रकार सुद्धा तिथेच अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया सोमवारी सुद्धा बार्बाडोसमधून निघू शकली नाही. सध्या टीम इंडिया इथल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे.

बार्बाडोसमधून हरारेला कधी जाणार?

बार्बाडोसच वादळ शिवम दुबे आणि संजू सॅमसन दोघांसाठी जास्त तापदायक आहे. कारण दोघांना बार्बाडोसवरुन झिम्बाब्वेला जायच आहे. या दोघांची झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच मॅचच्या T20 सीरीजसाठी टीममध्ये निवड झाली आहे. बार्बाडोसमध्ये अशीच स्थिती राहिली, तर हे दोघे कधी हरारेला जाणार. बार्बाडोसमध्ये हवामान सुधारेल आणि टीम इंडिया लवकरच मायदेशी परतेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.