AFG vs AUS सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण पोहचणार Semi Final मध्ये? जाणून घ्या

Afghanistan vs Australia CT 2025 : अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केल्याने बी ग्रुपमध्ये उपांत्य फेरीसाठी 3 संघात चुरस आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने शुक्रवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर?

AFG vs AUS सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण पोहचणार Semi Final मध्ये? जाणून घ्या
Rain
| Updated on: Feb 27, 2025 | 11:58 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला लोळवण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट टीम सज्ज झाली आहे. दोन्ही संघांकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहचण्याची संघी आहे. अफगाणिस्तानने हा सामना जिंकल्यास त्यांची वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आयसीसी वनडेतील स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहचण्याची सलग दुसरी वेळ ठरेल. मात्र अफगाणिस्तानसाठी हे आव्हानात्मक असणार आहे. अफगाणिस्तानसमोर वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान कशाप्रकारे कांगारुंचा सामना करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उपांत्य फेरीचं समीकरण

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीत पोहचतील आणि आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर होईल. तर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर ते सेमी फायनलमध्ये धडक देतील. त्यानंतर ग्रुप बी मधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम कोणती असणार? हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

समजा, अफगाणिस्ताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तसेच इंग्लंड दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला, तर टेम्बा बावुमाच्या टीमचे आणि ऑस्ट्रेलियाचे पॉइंट्स आहेत तितकेच 3-3 पॉइंट्स राहतील. त्यानंतर या दोघांपैकी ज्यांचं नेट रनरेट जास्त असेल ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

सामना पावसामुळे रद्द झाला तर?

आतामुळे या स्पर्धेत 2 सामने पावसामुळे रद्द झालेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान हे 2 सामने पावसाने जिंकले. त्यामुळे अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोण जिंकणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना आहे. अशा परिस्थितीत विजेता कोण असेल? हे जाणून घेऊयात.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 4 आणि अफगाणिस्तानचे 3 पॉइंट्स होतील. ऑस्ट्रेलिया 4 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचेल. तर दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही स्थितीत इंग्लंडविरुद्ध जिंकावंच लागेल. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पराभव झालाच तर तो मोठ्या फरकाने होऊ नयेत, अशीच आशा त्यांच्या क्रिकेट चाहत्यांना असेल. दक्षिण आफ्रिकेचा पराभवानंतर अफगाणिस्तानच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असेल तर ते उपांत्य फेरीच पोहचतील. मात्र अफगाणिस्तानचा नेट रनरेट चांगला राहिला तर ते पुढच्या फेरीत पोहचतील. त्यामुळे नेट रनरेट फॅक्टर निर्णायक ठरेल.

ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, सीन ॲबॉट आणि सीन ॲबॉट.

अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, नांगेलिया खरोटे आणि नावेद झाद्रान.