PAK vs NZ : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, कोण करणार विजयी सुरुवात?
Pakistan vs New Zealand Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. जाणून घ्या.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला बुधवार 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेता पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंड संघाची धुरा आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना केव्हा?
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना बुधवारी 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना कुठे?
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना कराचीतील नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 118 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने न्यूझीलंडवर 61 सामन्यात विजय मिळवला आहे. तर किवींनी 53 सामन्यात पलटवार करत पाकिस्तानवर विजय मिळवलाय. उभयसंघातील 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. तर 1 मॅच टाय राहिली.
न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनव्हे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.
पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.