IND vs BAN : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 5 खेळाडू फिक्स! कोण आहेत ते?

Indian Cricket team : टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत 3 सामने खेळणार असल्याचं निश्चित आहे. या 3 सामन्यांसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 5 खेळाडू असणार, हे जवळपास निश्चित आहे.

IND vs BAN : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 5 खेळाडू फिक्स! कोण आहेत ते?
team india rohit shreyas kuldeep
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 17, 2025 | 10:18 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला आता मोजून काही तास शिल्लक आहेत. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात ए ग्रुपमधील यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. तर टीम इंडियाचा 20 फेब्रुवारीला पहिला सामना होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. या 8 संघांना 4-4 प्रमाणे 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार प्रत्येक संघ साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 5 खेळाडूंची जागा निश्चित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ते 5 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

ते 5 खेळाडू कोण?

टीम इंडियाचे हे 5 खेळाडू फक्त बांगलादेश नाही, तर या स्पर्धेतील साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये असतील, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. तर युवा सलामीवीर शुबमन गिल हा उपकर्णधार आहे. तसेच रोहित आणि शुबमन हे दोघे ओपनर आहेत. त्यामुळे हो दोघे खेळणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषीची गरज नाही. अशाप्रकारे 5 पैकी 2 खेळाडू निश्चित झाले.

आता उर्वरित तिघे कोण?

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याला विसरुन कसं चालेल? विराट प्लेइंग ईलेव्हनमध्ये असणार म्हणजे असणारच. विराटवर मिडल ऑर्डरमध्ये टीमसाठी मोठी खेळी करण्याची जबाबदारी असणार आहे. विराटने असं अकनेकदा करुन दाखवलं आहे. विराटची बॅट गेल्या काही सामन्यांमध्ये तळपलेली नाही. मात्र या स्पर्धेत विराटने त्याचा धमाका दाखवून द्यावा, अशी आशा ,साऱ्या भारतीयांची असणार आहे.

केएल राहुल

केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांना विकेटकीपर बॅट्समन म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. “केएल राहुल हा आमची पहिली पसंती आहे”, अंस हेड कोच गौतम गंभीर याने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे केएलच विकेटकीपिंग करणार असल्याचं निश्चित आहे.

ऑलराउंडर हार्दिक

1 ऑलराउंडर 2 खेळांडूच्या तोडीचा असतो, असं म्हटलं जातं. बॉलर आणि बॅट्समन म्हणून गरजेनुसार त्या खेळाडूचा उपयोग करता येतो. त्यामुळे ऑलराउंडरचं महत्त्व किती असतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ऑलराउंडर म्हणून हार्दिकला संधी मिळणार असल्याचंही निश्चित आहे, असं म्हटलं जाऊ शकतं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.