IND vs AUS SF : मंगळवार दंगलवार! इंडिया ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये भिडणार, सामन्याला किती वाजता सुरुवात?

India vs Australia Champions Trophy 2025 Semi Final Live Streaming : मंगळवारी 4 मार्च रोजी क्रिकेट चाहत्यांना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दंगल पाहायला मिळणार आहे. सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही.

IND vs AUS SF : मंगळवार दंगलवार! इंडिया ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये भिडणार, सामन्याला किती वाजता सुरुवात?
rohit sharma vs steven smithi ind aus sf 1
Image Credit source: Bcci and Cricket Australia Facebook
| Updated on: Mar 03, 2025 | 6:59 PM

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 2 मार्चला न्यूझीलंडवर मात करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडिया या विजयानंतर ए ग्रुपमधून साखळी फेरीत नंबर 1 ठरली. तसेच या विजयानंतर उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित झाले. त्यानुसार, टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतील सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतील सामना मंगळवारी 4 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा आणि अ‍ॅडम झॅम्पा.