World Cup 2023 | भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यापासून ‘या’ दोन संघांचा अडथळा, याआधीही दिलाय धक्का!

2011 नंतर दोन वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता. त्यामुळे करोडो भारतीयांचं स्वप्न भंग झालं होतं. मात्र यंदा भारताने जोरदार तयारी केली असून विजेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरताना दिसेल. मात्र असे दोन संघ आहेत जे भारताला वर्ल्डकपमध्ये जड जावू शकतात.

World Cup 2023 | भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यापासून या दोन संघांचा अडथळा, याआधीही दिलाय धक्का!
| Updated on: Sep 26, 2023 | 11:45 AM

मुंबई : यंदाच्या वन डे वर्ल्ड कप 2023 चा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप असल्याने भारतीय खेळाडू पूर्ण फायदा घेतील. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा सर्वात मोठा फायदा सर्व खेळाडूंना होणार आहे. वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असला तरी भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑक्टोबरला पार पडणार आहे. यंदाच्या स्पर्धेआधी भारताने आशिया कप जिंकत आपली ताकद सर्वांना दाखवली आहे. रोहित अँड कंपनी विजेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल मात्र असे दोन संघ आहेत जे भारताला वर्ल्डकपमध्ये जड जावू शकतात.

कोणते आहेत ते दोन संघ?

2011 नंतर दोन वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता. त्यामुळे करोडो भारतीयांचं स्वप्न भंग झालं होतं. मात्र यंदा भारताने जोरदार तयारी केली असून विजेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरताना दिसेल. मात्र भारताच्या या विजयी स्पप्नामध्ये दोन मीठाचे खडे आहेत. यातील एक म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ.

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चॅम्पियन असलेला कांगारूंचा संघ भारताला नडू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच खेळाडूंनी आयपीएल खेळल्याने त्यांना भारतामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विजेतेपद जिंकलं आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांच्यासारखे मॅचविनर खेळाडू संघात आहेत.

ऑस्ट्रेलियानंतर दुसरा संघ इंग्लंड असून गेल्या काही वर्षांपासून इंग्लंड संघही ताकदीने पुढे आला आहे. 2019 मध्ये इंग्लंड संघाने पहिल्यांदा न्यूझीलंड संघाचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं होतं. हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि जोस बटलरसारखे घातक फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये मार्क वुड, ख्रिस वोक्स, सॅम कुरन, बेन स्टोक्स, मोईन अली यांच्यासारख्या चॅम्पिय खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांकडून भारतीय संघाला जास्त धोका आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्याकडे आयपीएल गाजवली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी भारतीय संघाने प्लॅन करून खेळायला हवं. नाहीतर करोडो भारतीयांचं स्वप्वावर पाणी फेरू शकतं.