दृष्ट आत्म्यापासून वाचण्यासाठी चीनचे लोक काय हातखंडे आजमावतात, एकेक प्रथा ऐकाल तर चकीत व्हाल
China Creepy Traditions:चीनचे लोक देखील नकारात्मक गोष्टी, वाईट नजर, दृष्ट आत्मा अशा गोष्टींपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी निरनिराळी कर्मकांडे आणि चित्र विचित्र परंपरा पाळत असतात.

China Creepy Traditions: वाईट आत्मा आणि वा नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी जगभराती विविध उपाय केले जातात. परंतू दृष्ट आत्म्याला दूर करण्यासाठी चीनचे लोक अजिब परंपरा पाळत असतात. ज्यांना ऐकून तुम्हाला धक्का बसेल…आणि भीतीही वाटेल…
चीनमध्ये वाईट आत्म्याला दूर करण्यासाठी तसेच नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी काही विचित्र प्रथा पाळल्या जातात. ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल. प्राचीन काळापासून चीनमध्ये या प्रथा पाळल्या जात आहेत. लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत.
कोंबडीचे मुंडके कापणे
चीनच्या काही भागात खास करुन दक्षिण चीनमध्ये लोक कोंबडीची मान कापून छतावर फेकतात.त्यामुळे दृष्ट आत्मा दूर रहातात असे मानले जाते. कोंबड्याच्या मुंडक्याला छतावर फेकण्यासह त्याचे रक्त घराच्या अंगणात शिंपडतात. आणि भितींलाही लावतात. यामुळे नरात्मकता दूर होते असे मानले जाते. चीन पारंपारिक रिवाजानुसार अत्यंसंस्कारानंतर मृताच्या आत्म्यास मोक्ष मिळण्यासाठी नेहमी कोंबड्यांचा वापर केला जातो.
ही प्रथा हान राजवंश ( २०६ ते २२० ईसवीसन पूर्व ) पासून सुरु आहे. तेव्हा लाकडाच्या कोंबड्यांना मृतांसोबत दफन केले जात होते. मात्र चीनमध्ये कोंबड्यांना शुभ पक्षी मानले जाते. जो जीवंत आणि मृतांना जोडतो. तसेच कोंबड्याच्या ओरडण्याला देखील सकारात्मक रुपाचे प्रतिक मानले जाते.
मीठ आणि तांदुळाचा उपाय
वाईट आत्म्यापासून वाचण्यासाठी चीनच्या लोकांना मीठ आणि तांदळाचा उपाय प्रभावी मानला जातो. असे म्हटले जाते की मीठ आणि तांदळाला वाईट आत्मे घाबरतात. फेंग शुई वा चीन भू-विज्ञानानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा शूद्ध करते. तांदुळ आत्म्याला शांत करण्याचे प्रतिक मानले जाते. यामुळे लोक घराच्या प्रत्येक खोलीत मीठ आणि तांदूळ टाकतात.
चीनचे लोक विशेषतः नवीन घरात राहायला जाताना,जुन्या आजारापासून बरे होण्यासाठी आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी असे करतात. हाँगकाँगच्या अनेक झोम्बी चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे, भूत किंवा राक्षसांच्या चाव्यावर उपचार म्हणून ग्लूटिनस तांदूळ वापरला जातो. चीनच्या काही ग्रामीण भागात, अंत्यसंस्काराच्या वेळी, मृतांचे कुटुंब आत्म्याला शांत करण्यासाठी कबरीभोवती मीठ आणि तांदूळ पसरवतात.
आगीतून उडी मारणे
नववर्ष किंवा वसंत ऋतूच्या उत्सवात साजरी केली जाणारी ही लोकप्रिय परंपरा आणि विधी आहे. यात लोक जळत्या आगीवरून उडी मारतात. लोककथेनुसार आगीचा कडकडाट वाईट आत्म्याला आणि नकारात्मक ऊर्जेला दूर करतो.शेतातील पिकांची चांगली कापणी आणि समृद्धीसाठीही हा उत्सव साजरा केला जातो.
हंग्री घोस्ट फेस्टीव्हल
हा उत्सव पूर्वजांचा किंवा आत्म्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. सातव्या चंद्र मासाचा १५ वा दिवस भूतांचा काळ मानला जातो. असे मानले जाते की या काळात आत्मे पृथ्वीवर येतात.लोक त्यांच्या पूर्वजांना मिठाई, फळे, अन्न, फुले आणि धूप असे नैवेद्य अर्पण करतात.या भीती नसून मृतात्म्यांबद्दल आदर, श्रद्धा आणि पूर्वजांशी असलेल्या संबंधाचे हा सण प्रतीक आहे. चीन व्यतिरिक्त, हा उत्सव तैवान, सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्येही साजरा होतो.
