ICC Test Rankings: लॉर्ड्समधील शतकामुळे जो रूट दुसऱ्या स्थानी, मोहम्मद सिराजलाही जबरदस्त फायदा

| Updated on: Aug 18, 2021 | 5:32 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. लॉर्ड्स टेस्टनंतर या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत.

ICC Test Rankings: लॉर्ड्समधील शतकामुळे जो रूट दुसऱ्या स्थानी, मोहम्मद सिराजलाही जबरदस्त फायदा
जो रुट
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील लॉर्ड्स कसोटीचा खेळाडूंच्या जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) भारतीय गोलंदाजाविरुद्ध केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे फलंदाजांच्या आयसीसी टेस्ट रँकिगमध्ये  (ICC Test Rankings) तो दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर भारताचे खेळाडू केएल राहुल, मोहम्मद सिराज यांनीही क्रमवारीत चांगली बढत मिळवली आहे.

जो रुटने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात अप्रतिम शतक ठोकले. दुसऱ्या सामन्यात तर त्याने 180 धावा केल्या. त्याच्या या शतकामुळे त्याला आयसीसी टेस्ट रँकिगमध्ये दुसरे स्थान मिळाले आहे. पहिल्या स्थानी अद्यापही न्यूझीलंडचा कर्णदार केन विलियम्सनच (Kane Williamson) विराजमान आहे. दोघांमध्ये केवळ 8 गुणांचा फरक आहे. जो रुटच्या खिशात 893 तर केनकडे 901 गुण आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी रूट  टेस्ट रँकिंगमध्ये कोहलीच्याही खाली पांचव्या स्थानावर होता. पण आता तो कोहलीली मागे टाकून 893 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय फलंदाजाचा विचार करता राहुलने दुसऱ्या डावात ठोकलेल्या शतकाने त्याला 37 धावांचा फायदा झाला आहे. तो 19 व्या स्थानावर पोहचला आहे. तर रोहित शर्मा सहाव्या स्थानी असून त्याने 773 गुण मिळवले आहेत. हे त्याचे आतापर्यंतते सर्वाधिक आहेत. ऋषभ पंतही सातव्या स्थानावर आहे.

सिराज आणि इशांतलाही फायदा

गोलंदाजीचा विचार करता इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन एका स्थानने पुढे गेला आहे. तो सहाव्या स्थानी विरजामान आहे. याशिवाय भारताचा जसप्रीत बुमराह देखील 10 व्या स्थानावर पोहचला आहे. तर लॉर्ड्सच्या मैदानात  8 विकेट चटकावणारा मोहम्मद सिराज (Mohammad siraj) यालाही चांगला फायदा झालेला आहे. तो 38 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या कारकर्दीतील आतापर्यंतची ही बेस्ट रँकिग आहे.

इतर बातम्या

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

(ICC mens test ranking revealed joe root on second position siraj also got good postion)