IND vs IRE Toss: टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय

T20 World Cup 2024 India vs Ireland Toss: टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड दोन्ही संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2009 नंतर यंदा 15 वर्षांनी पुन्हा एकदा आमनेसामने आहेत.

IND vs IRE Toss: टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय
IND vs IRE
| Updated on: Jun 05, 2024 | 8:44 PM

टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहितसेनेने आयर्लंड विरुद्धच्या सलामीच्या सामन्याआधी जोरदार सराव केला. त्याआधी पार पडलेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास वाढलेला आहे. अशात आता इंडिया विरुद्ध आयर्लंड सामन्याला अवघ्या काही मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. सामन्याला रात्री 8 वाजता नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आयर्लंडवर वरचढ

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 7 सामन्यांमध्ये भिडले आहेत. टीम इंडिया या सातही सामन्यात आयर्लंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या सातही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आता या सामन्यात विजय मिळवून 8 वा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

युवराज सिंहने वाढवला उत्साह

दरम्यान आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 चा ब्रँड अँबेसडर आणि टीम इंडियाचा दिग्गज ऑलराउंडर युवराज सिंह याने सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवला. युवराजने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. युवराज आणि टीम इंडियाच्या खेळाडूंचा हस्तांदोलन करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकला

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.