ENG vs SL : घाबरले वाटतं; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंड दहशतीत! काय झालं?

England vs Sri Lanka Super 8 : इंग्लंडची सामन्याच्या 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करण्याची परंपरा राहिली आहे. मात्र इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली नाहीय.

ENG vs SL : घाबरले वाटतं; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंड दहशतीत! काय झालं?
England Cricket Team
Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Feb 21, 2026 | 10:44 PM

टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 20 फेब्रुवारीला साखळी फेरीतील शेवटचा आणि 40 वा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात कॅनडावर मात करत आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने केला. त्यानंतर 21 फेब्रुवारीला सुपर 8 मधील पहिल्या आणि एकूण 41 व्या सामन्यात बी ग्रुपमधील न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. दोन्ही संघांनी साखळी फेरीत 4 पैकी प्रत्येकी 3 सामने जिंकले होते. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ सुपर 8 मोहिमेची सुरुवात विजयाने करणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना कुठे?

आता सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. हा सामना रविवारी 22 फेब्रुवारीला पल्लेकेले स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी एका कारणामुळे इंग्लंडची चर्चा पाहायला मिळत आहेत.

इंग्लंडने आतापर्यंत अनेकदा सामन्याच्या 24 तासांआधी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने या वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीत नेपाळ, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड विरूद्धच्या सामन्याआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड परंपरेनुसार सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्याआधी अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर करेल, असं क्रिकेट प्रेमींना वाटत होतं. मात्र इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची नावं जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेच्या कामगिरीचा धसका घेत 11 खेळाडूंची नावं जाहीर केली नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

इंग्लंडला श्रीलंकेच्या कामगिरीचा धसका?

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सहयजमान असलेल्या श्रीलंकेने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केलीय. श्रीलंकेने साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकले. श्रीलंकेने सलग 3 सामने जिंकत सुपर 8 फेरीत धडक दिली. श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध निर्णायक सामन्यात विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला होता. श्रीलंकेने यासह ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीतून बाहेर करण्यातही योगदान दिलं होतं.

तसेच श्रीलंकेचा ओपनर पाथुम निसांका याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावलं होतं. तसेच पाथुमने झिंबाब्वे विरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे एकूणच पाहता इंग्लंडने श्रीलंका आणि पाथुमच्या कामगिरीला घाबरुन सुपर 8 सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनचे पत्ते न उघडण्याचा निर्णय घेतलाय की काय? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे.