
मेन्स आणि वूमन्स टीम इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20I आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर हरमनप्रीत कौर हीने आपल्या नेतृत्वात भारताला पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप मिळवून दिला. भारताने अशाप्रकारे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक पूर्ण केली. आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. या स्पर्धेला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत यंदाही 20 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 20 संघ अवघ्या काही दिवसांपूर्वी निश्चित झाले आहेत. लवकरच या स्पर्धेचं वेळापत्रक अपेक्षित आहे. मात्र त्याआधी या स्पर्धेतील सामने कुठे आणि कोणत्या शहरात होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांसाठी शहरांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणेच भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यानुसार टी 20I स्पर्धेतील सामने हे 5 शहरात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वनडे वर्ल्ड कप 2023 च्या तुलनेत कमी शहरांत टी 20I विश्व चषकातील सामन्यांचं आयोजन करण्याबाबत निर्णय झाला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
रिपोर्ट्सनुसार, एका शहरात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येकी 6-6 सामने खेळवण्याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्यांचं एकमत झालं आहे. आता कोणत्या आणि किती शहरांमध्ये हे सामने होणार? याबाबतही चाहत्यांना उत्सुकता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील एकूण 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. या 5 शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाताचा समावेश आहे.
तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेतील एकूण 3 शहरांमध्ये या स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी सुरु आहे. मात्र कोणत्या 3 स्टेडियमला सामन्यांचं आयोजन करण्याचा मान मिळणार? हे अजून निश्चित नाही.
तसेच रिपोर्ट्सनुसार, वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत ज्या स्टेडियममध्ये सामने झाले तिथे टी 20I विश्व चषकातील सामन्याचं आयोजन न करण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने नवी मुंबई, विशाखापट्टणम, गुवाहाटी आणि इंदूरमधील स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते.
टी 20i वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये
🚨 NARENDRA MODI STADIUM LIKELY TO HOST THE T20I WORLD CUP FINAL 🚨
– The Shortlisted venues are Ahmedabad, Delhi, Kolkata, Chennai & Mumbai in India. [Devendra Pandey From Express Sports]
Each venue is likely to get 6 matches each. pic.twitter.com/jg1tSI8VXS
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2025
रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेने सेमी फायनलमध्ये क्वालिफाय केल्यास त्यांना कोलंबोत क्रिकेट सामना खेळण्यासाठी यावं लागेल. तसेच पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचल्यास महामुकाबला त्रयस्थ ठिकाणी होईल.