ICC Women’s T20 World Cup final: टी20 वर्ल्डकपच्या 10 व्या पर्वातील अंतिम फेरीच्या 10 गोष्टी
ENG W vs AUS W, ICC Women's T20 World Cup final: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. असं असताना या अंतिम सामन्याबाबत 10 गोष्टी जाणून घेऊयात..

ICC Women’s T20 World Cup final: टी20 वर्ल्डकपच्या 10 व्या पर्वातील अंतिम फेरीच्या 10 गोष्टी
Image Credit source: ICC Twitter
ENG W vs AUS W, ICC Women’s T20 World Cup 2026 final: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमनेसामने आहेत. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अंतिम फेरीचा सामना होत आहे. दोन संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकही सामना न गमावता या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं 10 वं पर्व खास असणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाची पकड राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या नऊ पर्वापैकी 6 पर्वात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एक जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे दहाव्या पर्वात जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील 10 मोठ्या गोष्टी
- टी20 क्रिकेट इतिहासात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 46वा सामना होत आहे. आतापर्यत झालेल्या 46 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 23, तर इंग्लंडने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे.
- टी20 वर्ल्डकप यजमानपद असलेल्या इंग्लंडचा मायभूमीत रेकॉर्ड चांगला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे. 2009 ते 2026 या कालावधीत इंग्लंडने देशात 11 सामने खेळले आणि या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे.
- टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळणारे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आहेत. ऑस्ट्रेलिया आठव्यांदा अंतिम फेरी खेळणार आहे. तर इंग्लंडने पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
- इंग्लंडने आतापर्यंत वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भूषवलं आहे, त्यात जेतेपद मिळवलं आहे. मग वनडे असो टी20 वर्ल्डकप… त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही लढत वाटते तितकी सोपी नाही.
- ऑस्ट्रेलियाकडे वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास रचण्याची संधी आहे. आतापर्यंत सहा वेळा जेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेत विजयी झाले तर सातवं जेतेपद असेल. तर इंग्लंडने या स्पर्धेच्या पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर झोळी रितीच आहे.
- ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पराभूत करणं कठीण आहे. वुमन्स वर्ल्डकप टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने पाच, तर इंग्लंडने दोन वेळा विजय मिळवला आहे. अंतिम फेरीत तीन वेळा आमनासामना झाला आणि प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे.
- आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणारा संघ मालामाल होणार आहे. विजेत्या संघाला 2.34 मिलियन डॉलर म्हणजेच 22 कोटी रुपये मिळतील.
- वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे. कारण पराभूत झाल्यानंतर 1.17 मिलियन डॉलर बक्षिसी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच जवळपास 11 कोटी रोख रक्कम मिळेल.
- वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, नेदरलँड, पाकिस्तान आणि भारताला पराभूत केलं. तर उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजला नमवलं. इंग्लंडने श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलँड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला मात दिली. तर उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेला नमवलं.
- वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा 7.30 वाजता होणार आहे.
Follow Us