AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC World Cup 2023 | वर्ल्ड कपमधील ‘हे’ 3 सामने बिघडवू शकतात टीम इंडियाचा खेळ, BCCI वर उलटू शकतो निर्णय

ICC World Cup 2023 | वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा मार्ग सोपा नाहीय. मायदेशात वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडियाला फेव्हरेट मानलं जातय. पण तीन अशा टीम्स आहेत, जे भारतीय फॅन्सच्या अपेक्षांना धक्का देऊ शकतात.

ICC World Cup 2023 | वर्ल्ड कपमधील 'हे' 3 सामने बिघडवू शकतात टीम इंडियाचा खेळ, BCCI वर उलटू शकतो निर्णय
Image Credit source: AFP
| Updated on: Jun 29, 2023 | 9:06 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम 2011 नंतर पहिल्यांदा मायदेशात वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. आयसीसीने वनडे वर्ल्ड कपसाठी शेड्युल जाहीर केलं आहे. पाच ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होईल. 19 नोव्हेंबरला फायनलचा सामना होणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. टीम इंडिया नऊ वेगवेगळ्या मैदानावर वर्ल्ड कपचे सामने खेळणार आहे.

टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. पण वर्ल्ड कपमध्ये तीन असे सामने आहेत, जे टीम इंडियाचा खेळ बिघडवू शकतात. भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध हे तीन सामने खेळायचे आहेत.

तिन्ही टीम्समध्ये भारताला हरवण्याची क्षमता

सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील हे तीन मजबूत संघ आहेत. इंग्लंड विद्यमान विजेता म्हणून वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. न्यूझीलंडची टीम सलग दोन वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळली आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. या तिन्ही टीम्समध्ये भारताला त्यांच्या घरात हरवण्याची क्षमता आहे.

चेन्नईत ऑस्ट्रेलियाने ताकत दाखवलीय

टीम इंडिया चेपॉकवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला आपला पहिला सामना खेळणार आहे. ही विकेट मंदावणारी आणि स्पिनर्सना मदत करणारी आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलियाला सहज हरवेल, भारताकडे चांगले स्पिनर आहेत, अस सर्वांना वाटेल. पण ऑस्ट्रेलियन टीम भारतावर डाव उलटवू शकते. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी ते दाखवून दिलय. ऑस्ट्रेलियन टीमने मार्च महिन्यात या मैदानावर वनडे सामन्यात भारताला 21 धावांनी हरवलं होतं.

चेन्नईच्या मैदानात त्या सामन्यात भारतापेक्षा ऑस्ट्रेलियन स्पिनर प्रभावी ठरले होते. एडम जम्पा आणि एश्टन एगरसमोर भारतीय फलंदाज ढेपाळले होते. 270 धावांच टार्गेट चेस करता आलं नव्हतं. जम्पाने चार आणि एगरने दोन विकेट काढले होते. टीम इंडियाची समस्या ही आहे की, त्यांच्याकडे स्पिन गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळणारे फलंदाज नाहीत.

धर्मशाळामध्ये न्यूझीलंडची टीम पडू शकते भारी

त्यानंतर भारताचा दुसरा कठीण सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. धर्मशाळा येथे ही मॅच होईल. धर्मशाळाच्या विकेटवर बाऊन्स आणि वेग आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो. आपल्या घरच्या मैदानात खेळतोय, असं त्यांना वाटेल. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, टिम साऊदी या गोलंदाजांना विकेटकडून मदत मिळाली, तर ते कुठल्याही फलंदाजीची वाट लावू शकतात. बाऊन्स आणि वेगवान विकेटवर भारतीय फलंदाजांची कमजोरी सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धचा सामना कठीण असेल. भारताविरुद्ध इंग्लंडची ताकत काय?

इंग्लंड विरुद्ध 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये सामना होणार आहे. इकाना स्टेडियमवर ही मॅच होईल. आयपीएल 2023 चे सामने या पीचवर झाले होते. तेव्हा खेळपट्टी धीमी आणि फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असल्याच लक्षात आलं. इंग्लंडकडे सध्याच्या घडीला आदिल रशीद सारखा चांगला स्पिनर आहे. त्याशिवाय मोईन अलीसारखा ऑफ स्पिनर आहे. इंग्लंडची टीम भारताच्या अडचणी वाढवू शकते. इंग्लिश टीममधील अनेक क्रिकेटपटू भारतात आयपीएल खेळतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.