Icc World Cup 2023 | Pakistan विरुद्धचा सामना बंद दाराआड, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

icc world cup 2023 | क्रिकेट चाहते वर्ल्ड कपसाठी उत्सुक आहेत. कधी वर्ल्ड कपला सुरुवात होतेय, अशी स्थिती क्रिकेट चाहत्यांची झालीय. मात्र त्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा क्रिकेट चाहत्यांना मैदानात जाऊन पाहता येणार नाहीये.

Icc World Cup 2023 | Pakistan विरुद्धचा सामना बंद दाराआड, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 25, 2023 | 9:41 PM

मुंबई | एकदिवसीय विश्व चषक 2023 स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी श्रीलंका आणि बांगलादेश या दोघांनीच वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा केलेली नाही. वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लागलेलं आहे. हा सामना शनिवारी 14 ऑक्टोबरला होणार आहे.

या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा बंद दाराआड होणार असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. बीसीसीआयने ट्विटमध्ये काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊयात.

वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील सामने 5 ऑक्टोबरपासून होणार आहेत. त्याआधी सराव सामने होणार आहेत. एकूण 10 सहभागी संघ सराव सामने खेळणार आहेत. त्यानुसार पाकिस्तानही सराव सामना हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा 29 सप्टेंबर आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना क्रिकेट चाहते मैदानात जाऊन पाहू शकणार नाहीत.

बीसीसीआयने काय म्हटलंय?


“सराव सामन्याच्या दिवशी 29 सप्टेंबरला सणोत्सव आहेत. त्यामुळे एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सामना बंद दाराआड खेळवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सामन्याला क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहून आनंद घेऊ शकणार नाहीत. तसेच ज्या क्रिकेट चाहत्यांना तिकीट बूकिंग केली, त्यांना रक्कम परत दिली जाईल”, अशी माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिलीय.

वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेवन कॉनवे, लोकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिम्मी नीश, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली , उसामा मीर आणि मोहम्मद वसीम जूनियर.