
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममधील फलंदाज विल जॅक्सने तुफानी बॅटिंग केली. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट टुर्नामेंटच्या एका सामन्यात विल जॅक्सने सलग 5 सिक्स मारले. त्याने मिडिलसेक्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मात्र, तरीही त्यांची टीम हरली. सरेकडून खेळणाऱ्या विल जॅक्सच्या टीमने 252 धावांच डोंगराएवढ लक्ष्य उभारलं होतं. विल जॅक्सने 45 चेंडूत 96 धावा फटकावल्या. जॅक्सने ल्यूक हॉलमॅनच्या 11 व्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स मारले.
अखेरच्या चेंडूवर 6 वा सिक्स मारण्याची त्याची संधी हुकली. शेवटच्या चेंडूवर त्याने सिंगल धाव घेतली. हॉलमॅनने आपल्या ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या.
आरसीबीने त्याला किती कोटींना विकत घेतलं?
विल जॅक्सला आयपीएल 2023 मिनी ऑक्शनमध्ये आरसीबीने 3.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2019 मध्ये लँकशायर विरुद्धच्या सामन्यात एका ओव्हरमध्ये त्याने 6 सिक्स मारण्याची कमाल केलीय.
Two HUGE sixes from Chris Jordan power us to 2⃣5⃣2⃣ /7⃣ from 20 overs ?
Surrey smash their highest-ever T20 score at The Kia Oval. Again.
An astonishing display of hitting! ?
? | #SurreyCricket pic.twitter.com/U2M0tdCvY4
— Surrey Cricket (@surreycricket) June 22, 2023
166 पर्यंत एकही विकेट नाही
सरे आणि मिडिलसेक्समध्ये विटालिटी ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये सामना झाला. सरेची टीम पहिली बॅटिंग करण्यासाठी उतरली होती. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 252 धावांच डोंगराएवढ लक्ष्य उभारलं. सरेने 166 धावांपर्यंत एकही विकेट गमावला नव्हता. त्यानंतर पुढच्या 8 ओव्हरमध्ये त्यांनी 7 विकेट गमावल्या. जॅक्सने 28 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली.
मिडिलसेक्स कडूनही तुफानी बॅटिंग
जॅक्सने 96 धावांच्या इनिंगमध्ये 8 फोर आणि 7 सिक्स मारले. त्याशिवाय इवान्सने 85 धावा फटकावल्या. इवान्सने 9 फोर आणि 5 सिक्स मारले. 253 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करायला उतरलेल्या मिडिलसेक्सने 4 चेंडू बाकी राखून 7 विकेटने विजय मिळवला. कॅप्टन स्टीफनने 39 चेंडूत 73 धावा आणि मॅक्स होल्डनने 35 चेंडूत 68 धावा केल्या.
Exceptional batting from Will Jacks ?
He hits 31 from the over, just missing out on six sixes ?#Blast23 pic.twitter.com/RVrsw20clo
— Vitality Blast (@VitalityBlast) June 22, 2023
15 मॅचमधील मिडिलसेक्सचा पहिला विजय
मागच्या 15 T20 सामन्यातील मिडिलसेक्सचा हा पहिला विजय आहे. मिडिलसेक्सने सरेवर विजय मिळवण्यापूर्वी या सीजनमध्ये साऊथ ग्रुपमध्ये 10 सामने गमावलेत. मागच्या सीजनमध्ये 4 सामने गमावले. आता त्यांनी टी 20 ब्लास्टच्या इतिहासातील सर्वात मोठं लक्ष्य गाठून सीजनमधील विजयाच खातं उघडलय.