AUSW vs INDW, 2nd T20: भारतीय फलंदाजानी ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले, 4 विकेट्सने गमावला सामना

| Updated on: Oct 09, 2021 | 8:48 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला अगदी थोडक्यात पराभव पत्करावा लागला. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे.

AUSW vs INDW, 2nd T20: भारतीय फलंदाजानी ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले, 4 विकेट्सने गमावला सामना
भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
Follow us on

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने, एक कसोटी सामना आणि तीन टी20 सामने खेळवले जाणार होते. दौऱ्याच्या सुरुवातीने दोन एकदिवसीय सामने भारतीय महिलांना गमावले. त्यानंतर तिसरा सामना जिंकला. पण तोवर मालिका 2-1 ने ऑस्ट्रलेयाने जिंकली. ज्यानंतर एकमेव कसोटी सामना आणि पहिली टी20 ही अनिर्णीत सुटली. ज्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला 4 विकेट्सनी पराभूत झाल्या.

सामन्यात नाणेफेक गमावल्याने भारतीय महिलांना प्रथम फलंदाजी करावी लागली. यावेळी त्यांनी केवळ 20 षटकात 118 धावाच केल्या. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य पाच चेंडू राखून पूर्ण केलं. त्यामुळे सामनाही चार विकेट्सने ऑस्ट्रेलियाने खिशात घातला. मालिकेतील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिकेचा रिजल्ट तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यावर अवंलबून आहे.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलिया विजयी

सामन्यात भारतीय फलंदाजानी प्रथम फलंदाजी केली. पण कर्णधार हरमणप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांनी केवळ काही काळ झुंज दिली. पुजाने शेवटच्या काही षटकांत 27 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. ज्यामुळे भारत किमान 118 धावा करु शकला. त्याआधी कर्णधार कौरने 28 धावा केल्या होत्या. इतर सर्व फलंदाज अयशस्वी झाले.

त्यानंतर 119 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाकी सुरुवात चांगली नव्हती. दुसऱ्या चेंडूवरच एलिसा हीली बाद झाली. ज्यानंतर मेग लेनिंग (4) आणि बेथ मूनी (34) यांनी डाव सांभाळला. पण गायकवाडने दोघांना बाद केलं. पण अखेर ताहलिया मॅक्गाने नाबाद 42 धावा करत संघाला 5 चेंडू आणि 4 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

शिखा पांडेकडून महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट डिलेव्हरी

सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. मात्र सामन्यात भारताची गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या एका चेंडूने सर्वांचीच मनं जिंकली. शिखाने ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिसा हीलीला दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचित केले. पण हा चेंडू ज्याप्रकारे स्विंग झाला. त्याने सर्वांनाच चकीत केलं. अनेकांनी तर या डिलेव्हरीला महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट डिलेव्हरी असल्याचंही म्हटलं आहे. अनेकांनी या डिलेव्हरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत त्याचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा

IPL 2021: तगडी मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाण्यात अयशस्वी, अपयशामागे संघातीलच पाच खेळाडू कारण

T20 World Cup 2021 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज संघाबाेहर

IPL 2021 च्या लीग सामन्यांनंतर ऑरेंज कॅप केएल राहुलकडे, अशी आहे संपूर्ण यादी

(In India vs Australia Womens Cricket 2nd T20 Match Indian Women Lost with 4 wickets)