AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज संघाबाेहर

आगामी टी-20 विश्वचषकाला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना पाकिस्तान क्रिकेट संघाला एक झटका बसला आहे. त्यांचा एक धडाकेबाज फलंदाज स्पर्धंतून बाहेर गेला आहे.

T20 World Cup 2021 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज संघाबाेहर
सोहेब मकसूद
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 5:00 PM
Share

कराची :  आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सर्व संघ सज्ज झाले आहे. काही दिवसांतच या स्पर्धेचा थरार युएईत सुरु होणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) नुकतेच तीन बदल करत संघ अजून मजबूत केला. पण या बदलानंतर लगेचच संघातील एक धडाकेबाज खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे.

पाकिस्तान संघातील स्फोटक फलंदाज शोएब मकसूद (Shoaib Maqsood) विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असताना दुखापतग्रस्त झाला आहे. काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे मकसूद त्रस्त असताना आता ही दुखापत वाढल्याने तो स्पर्धेबाहेर झाला आहे. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानात खेळवल्या गेलेल्या टी20 टूर्नामेंटमध्ये नॅशनल टी20 कपमध्ये 6 ऑक्टोबर रोजीच्या एका सामन्यादरम्यान मकसूदला दुखापत झाली आहे. त्यानंतर मेडीकल टीमने तपासणीनंतर त्याला विश्रांतीच्या सूचना दिल्याने तो विश्वचषकातून बाहेर झाला आहे. नुकतेच पाकिस्तान संघाने तीन बदल केले होते. त्यामुळे आता मकसूदच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.

पाकिस्तानकडून संघात 3 बदल

विश्वचषकासाठी सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ :

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, सरफराज अहमद, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, फखर जमान, मोहम्मद हफीज, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद (दुखापग्रस्त), शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : खुशदिल शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणदे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

(Pakistan batsman sohaib maqsood out of T20 world cup due to back injury)

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?