AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

Ramiz Raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या 50 टक्के बजेट हे ICCच्या आर्थिक अनुदानातून मिळतं, आणि ICCच्या कमाईचा मोठा हिस्सा हा भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCIकडून मिळतो.

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तान बोर्ड हे ICC ने दिलेल्या 50 टक्के निधीवर चालतं, आणि ICC ला 90 टक्के फंडिग हे BCCI म्हणजेच भारताकडून होतं- रमीज राजा
Updated on: Oct 08, 2021 | 11:56 AM
Share

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) हा भारताच्याच पैशांवर चालतो, हे आता खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनीच कबुल केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांना एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, यामध्ये ते BCCI मुळेच कशाप्रकारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket) अजूनही आपलं अस्तित्त्व टीकून आहे हे सांगत आहे. एवढंच नाही तर जगाच्या क्रिकेटवर आज BCCIचं राज्य आहे, ICC देखील BCCI मुळेच सुरु असल्याचं खुद्द रमीज राजा यांनी मान्य केलं आहे. (Ramiz Raja says Pakistan Cricket Board ruin if BCCI stop funding of ICC)

PCB चे नवे अध्यक्ष रमीज राजा सध्या त्यांना स्वावलंबी होण्याचं स्वप्न दाखवत आहेत, त्याच्य पार्श्वभूमीवर त्यांनी क्रिकेट बोर्डाची बैठक घेतली, त्यात त्यांनी जे काही वास्तव आहे, ते सगळं सांगून टाकलं. रमीज राजा म्हणाले,”पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या 50 टक्के बजेट हे ICCच्या आर्थिक अनुदानातून मिळतं, आणि ICCच्या कमाईचा मोठा हिस्सा हा भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCIकडून मिळतो. त्यामुळेच पाकिस्तानला ICC वरील परावलंबित्त्व कमी करण्याची गरज आहे.” भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

रमीज राजा यावरच थांबत नाहीत, तर पाकिस्तान सरकारला अजून स्वच्छपणे आरसा दाखवतात. ते म्हणतात की, ” भारताने जर निधी थांबवला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळेल,” पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की, पाकिस्तान आयसीसीला किती फंडिंग करतो, त्यावर रमीज राजा शुन्य असं उत्तर देतात. रमीज राजा म्हणतात की, पाकिस्तान बोर्ड हे ICC ने दिलेल्या 50 टक्के निधीवर चालतं, आणि ICC ला 90 टक्के फंडिग हे BCCI म्हणजेच भारताकडून होतं, जर उद्या भारताच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला की, आयसीसीचं फंडिंग थांबवायचं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अवस्था वाईट होईल.

रमीज राजा काय म्हणाले, पाहा व्हिडीओ:

सध्या अशी परिस्थिती आहे की, कोणत्याही देशाला पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायचं नाही. अलीकडेच, न्यूझीलंड आणि इंग्लंडनेही त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला मोठं आर्थिक नुकसानंच झालं नाही तर, त्याचा मोठा मनस्तापही सहन करावा लागला.

भारत पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी लढेल

लवकरच T20 वर्ल्डकप सुरु होणार आहे, त्यात 24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आहे. दुबईमध्ये दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवलं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक उद्योजक कोरो चेक देणार असल्याचं रमीज राजा यांनी या बैठकीत सांगितलं.

हेही वाचा:

MI vs SRH: मुंबईला आज फक्त धुंवाधार बॅटिंगची गरज, 171 च्या फरकाने हैदराबादला हरवलं तरच नशीब पालटणार, हे 4 फलंदाज महत्त्वाचे!

PHOTO: दीपकने प्रपोज केलेली मुलगी कोण?, बॉलिवुडशी आहे खास नातं

कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्...
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं.
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका.
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले.
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?.
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?.
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार.
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्...
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्....
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून...
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून....