AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: तगडी मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाण्यात अयशस्वी, अपयशामागे संघातीलच पाच खेळाडू कारण

तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद मिळवलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदा प्लेऑफमध्येही पोहचू शकला नाही. अखेरचा सामना जिंकला असला तरी नेट रनरेटच्या जोरावर केकेआरने प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे.

IPL 2021: तगडी मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाण्यात अयशस्वी, अपयशामागे संघातीलच पाच खेळाडू कारण
मुंबई इंडियन्स संघ
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 7:28 PM
Share

IPL 2021: शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबई इंडियन्सनी (MI vs SRH) स्पर्धेचा शेवट गोड केला. अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला. पण तरीदेखील नेट रनरेटच्या जोरावर केकेआर (KKR) मुंबईपेक्षा पुढे असल्याने मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही.

दरम्यान तब्बल 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलेला संघ यंदा प्लेऑफमध्येही पोहचू शकला नसल्याने सर्वचजण चकीत आहेत. पण याला कारणही संघातीलच काही खेळाडू आहेत. अतिशय तगडा संघ असलेल्या मुंबईचे पाच महाऱथी यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याने मुंबईला यंदा स्पर्धेतून इतक्या लवकर बाहेर पडावे लागले. हे पाच खेळाडू असे आहेत ज्यांनी मुंबईला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण यंदा त्यांना कमाल करता आलीच नाही.

1. रोहित शर्मा

या पाच खेळाडूंमध्ये सर्वात पहिलं नाव म्हणजे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). कर्णधार म्हणून अपयशी ठरलेला रोहित यंदा खास फलंदाजीही करु शकला नाही. त्याने 13 सामन्यात 29.30 च्या सरासराने 127.42 च्या स्ट्राइक रेटने 381 धावा केल्या. केवळ एकचं अर्धशतक ठोकले्या रोहितला संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाता आले नाही.

2. हार्दीक पंड्या

हार्दीक पंड्या (Hardik Pandya) हे या यादीतील दुसरं नाव आहे. संघाचा स्टार अष्टपैलू यंदा दुखापतीमुळे सतत ग्रस्त होता. त्यामुळे तो काही सामन्यांनाही हुकला. खेळला त्या सामन्यात 14.11 च्या सरासरीने 113.39 च्या स्ट्राइक रेटने 127 धावाचं केल्या. त्याने एकही ओव्हर यंदा गोलंदाजी केली नाही.

3. कृणाल पंड्या

संघातील दुसरा अष्टपैलू खेळाडू आणि हार्दीकचा भाऊ कृणाल पंड्याही (Krunal Pandya) यंदा खास कामगिरी करु शकला नाही. अनेकदा काही सामन्यांत संघाला विजय मिळवून देणाऱ्या कृणालने यंदा फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमध्येही खास चमक दाखवली नाही. त्याने 13 सामन्यात 14.30 च्या सरासरीने आणि 116.26 च्या स्ट्राइक रेटने  143  धावा केल्या. तर 7.98 च्या इकॉनमी रेटने केवळ 5 विकेट घेतले.

4. कायरन पोलार्ड 

संघाचा उपकर्णधार आणि दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हादेखील त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकला नाही. त्याने 14 सामन्यात 30.62 च्या सरासरीने आणि 148.48 च्या स्ट्राइक रेटने 245 धावाचं केल्या. तर 7.21 च्या इकॉनमी रेटने केवळ 5 विकेटचं घेतल्या.

राहुल चाहर

या यादीत अखेरचं नाव संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहरचंही (Rahul Chahar) नाव आहे. त्याच्या फिरकीची जादू यंदा चालली नाही. त्याने 11 सामन्यात 24.46 च्या सरासरीने आणि 7.39 च्या इकॉनमी रेटने केवळ 13 विकेट्स घेतल्या. त्यात तो आगामी टी20 विश्वचषकासाठीही भारतीय संघात असल्याने बीसीसीआयच्या चिंतेतही वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

#MIvsSRH : सामना जिंकला, पण रनरेटच्या लढाईत मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही, KKR चाहत्यांकडून मजेशीर मीम्स व्हायरल

IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय

MI vs SRH: इशान किशन ON FIRE, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक, दिग्गजांना टाकलं मागे

(In IPL 2021 Mumbai Indians Star Players out of form let MI Out of Playoff)

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...