SRH vs MI Live Score, IPL 2021 : मुंबईकडून स्पर्धेचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात हैदराबादवर 42 धावांनी मात

| Updated on: Oct 08, 2021 | 11:54 PM

आयपीएल 2021 च्या लीग फेरीचा आज शेवटचा दिवस आहे. आज एकाच वेळी दोन सामने खेळवले जात आहेत. त्यापैकी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे.

SRH vs MI Live Score, IPL 2021 : मुंबईकडून स्पर्धेचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात हैदराबादवर 42 धावांनी मात

आयपीएलच्या साखली फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील 55 व्या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर इशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. इशान किशनच्या 84 आणि सूर्यकुमार यादवच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकात 193 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईने या सामन्यात 42 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 14 गुण मिळवले आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट कोलकात्यापेक्षा कमी असल्यामुळे मुंबई प्ले ऑफसाठी क्वालिफाय होऊ शकले नाहीत. मुंबईचा नेट रनरेट 0.12 आहे तर कोलकात्याचा नेट रनरेट 0.58 इतका आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Oct 2021 11:23 PM (IST)

    मुंबईला 8 वं यश, रिद्धीमान साहा 2 धावांवर बाद

    नॅथन कुल्टर नाईलने मुंबईला 8 विकेट मिळवून दिली आहे. त्याने रिद्धीमान साहाला 2 धावांवर असताना स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद बाद (हैदराबाद 182/2)

  • 08 Oct 2021 11:16 PM (IST)

    मुंबईला 7 वं यश, राशिद खान 9 धावांवर बाद

    जसप्रीत बुमराहने मुंबईला 7 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने राशिद खानला (9) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (177/7)

  • 08 Oct 2021 11:12 PM (IST)

    मुंबईला 6 वं यश, जेसन होल्डर बाद

    नॅथन कुल्टर नाईलने मुंबईला 6 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने जेसन होल्डरला (1) ट्रेंट बोल्टकरवी झेलबाद केलं.

  • 08 Oct 2021 10:33 PM (IST)

    हैदराबादला चौधा धक्का, अब्दूल समद शून्यावर बाद

    जेम्स निशमने मुंबईला चौथं यश मिळवून दिलं आहे. त्याने अब्दूल समदला शून्यावर कायरन पोलार्डकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 100/4)

  • 08 Oct 2021 10:29 PM (IST)

    हैदराबादला तिसरा धक्का, मोहम्मद नबी 3 धावांवर बाद

    पिषुष चावलाने मुंबईला तिसरं यश मिळवून दिलं आहे. त्याने मोहम्मद नबीला 3 धावांवर असताना कायरन पोलार्डकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 97/3)

  • 08 Oct 2021 10:23 PM (IST)

    हैदराबादला दुसरा धक्का, अभिषेक शर्मा 33 धावांवर बाद

    हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे. जेम्स निशमने अभिषेक शर्माला 33 धावांवर असताना कुल्टर नाईलकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 79/2)

  • 08 Oct 2021 10:08 PM (IST)

    हैदराबादच्या सलामीवीरांचा पलटवार 4.5 षटकात 60 धावा

    हैदराबादच्या सलामीवीरांनी शानदार पलटवार केला आहे. जेसन रॉय आणि अभिषेक शर्माने 4.5 षटकात धावफलकावर 60 धावा झळकावल्या आहेत. पाचव्या षटकात अभिषेक शर्माने सलग तीन चौकार फटकावले.

  • 08 Oct 2021 10:08 PM (IST)

    हैद्राबादची आश्वासक सुरुवात

    मुंबईच्या 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादने उत्तम सुरुवात केली आहे. सलामीवीर जेसन रॉय तुफान फलंदाजी करत असून 5 षटकानंतर एकही विकेट न गमावता हैद्राबादचा स्कोर 60 धावा आहे.

  • 08 Oct 2021 09:29 PM (IST)

    मुंबईचा 9 वा फलंदाज माघारी

    सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईने 9 वी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने सूर्यकुमारला 82 धावांवर असताना मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं.

  • 08 Oct 2021 09:12 PM (IST)

    मुंबईला 7 वा धक्का, कुल्टर नाईल 3 धावांवर बाद

    मुंबईने सातवी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने नॅथन कुल्टर नाईलला 3 धावांवर असताना मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं. (मुंबई 206/7)

  • 08 Oct 2021 08:47 PM (IST)

    RCB vs DC: कर्णधार पंत स्वस्तात माघारी

    दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत डॅनियल ख्रिस्टीयनच्या चेंडूवर 10 धावा करुन बाद झाला आहे.

  • 08 Oct 2021 08:45 PM (IST)

    मुंबईचा पाचवा फलंदाज माघारी, जिमी निशम शून्यावर बाद

    अभिषेक शर्माने जिमी निशम शून्यावर बाद केलं. मोहम्मद नबीने सुरेख झेल घेत त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (मुंबई 151/5)

  • 08 Oct 2021 08:42 PM (IST)

    मुंबईचा चौथा फलंदाज माघारी, कायरन पोलार्ड 13 धावांवर बाद

    अभिषेक शर्माने कायरन पोलार्डला (13) जेसन रॉयकरवी झेलबाद केलं. (मुंबई 151/4)

  • 08 Oct 2021 08:23 PM (IST)

    मुंबईला मोठा झटका, इशान किशन 84 धावांवर बाद

    मुंबईने मोठी विकेट गमावली आहे. उम्रान मलिकने आक्रमक इशान किशनला 84 धावांवर यष्टीरक्षक रिद्धीमान साहाकरवी झेलबाद केलं. (मुंबई 124/3)

  • 08 Oct 2021 08:15 PM (IST)

    मुंबईला दुसरा झटका, हार्दिक पंड्या 10 धावांवर बाद

    मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने हार्दिक पंड्याला 10 धावांवर असताना जेसन रॉयकरवी झेलबाद केलं. (मुंबई 113/2)

  • 08 Oct 2021 08:03 PM (IST)

    मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा 18 धावांवर बाद

    मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. फिरकीपटून राशिद खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं. (मुंबई 83/1)

  • 08 Oct 2021 07:51 PM (IST)

    अवघ्या 16 चेंडूत इशान किशनचं अर्धशतक, चौकार-षटकारांची बरसात

    अवघ्या 16 चेंडूत आणि सामन्यातील चौथ्याच षटकात इशान किशनने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं आहे. ( 4 षटकात मुंबई 67/0)

  • 08 Oct 2021 07:40 PM (IST)

    किशनचे सलग तीन चौकार

    दुसऱ्या षटकात किशनने सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकर ठोकले

  • 08 Oct 2021 07:37 PM (IST)

    किशनचा षटकार

    सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर इशान किशनने शानदार षटकार ठोकून चांगली सुरुवात केली आहे

  • 08 Oct 2021 07:27 PM (IST)

    मनिष पांडे हैद्राबादचा कर्णधार

    सनरायर्स हैद्राबादचा कर्णधार केन विल्यमसनच्या हाताला दुखापत झाल्यामुळे आजच्या सामन्यात मनिष पांडे कर्णधार असणार आहे.

  • 08 Oct 2021 07:25 PM (IST)

    MI ची प्लेईंग 11

    रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स निशाम, जसप्रीत बुमराह, नाथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.

  • 08 Oct 2021 07:24 PM (IST)

    SRH ची प्लेईंग 11

    जेसन रॉय , रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनिष पांडे (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रियम गार्ग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, सिद्धार्थ कौल.

  • 08 Oct 2021 07:23 PM (IST)

    नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

    मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Published On - Oct 08,2021 7:22 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.