VIDEO: गुरुवर्य धोनी शिष्य पंतला देतोय खास ट्रेनिंग, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी भारत सज्ज

| Updated on: Oct 20, 2021 | 7:28 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या भव्य सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून सध्या नेटमध्ये सरावासह सराव सामनेही खेळाडू खेळत आहेत.

VIDEO: गुरुवर्य धोनी शिष्य पंतला देतोय खास ट्रेनिंग, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी भारत सज्ज
धोनी आणि पंत
Follow us on

दुबई: स्टम्प्समागून खेळ बदलवणारा महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सध्या संघात नसला तरी मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून तो संघासोबत आहे. तो कायम खेळाडूंचा सराव घेताना दिसत असून आज झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यानही संघात नसलेल्या ऋषभ पंतचा सराव धोनी घेत होता. 2007 साली कर्णधार म्हणून भारताता टी20 विश्वचषक जिंकवून देणारा धोनी यंदा पुन्हा ही कामगिरी मेंटॉर म्हणून करणार. अशी आशा सर्वांना आहे. तो यासाठी प्रयत्नही करताना दिसत आहे.

धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला सर्वाधिक त्याची कमी एक यष्टीरक्षक आणि फिनीशर म्हणून भासत आहे. त्यामुळेच की काय पण तो सर्वाधिक वेळ ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यासह घालवताना दिसतो. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही ऋषभ पंतला विश्रांती देऊन इशानला यष्टीरक्षणासाठी मैदानात पाठवलं होतं. त्यावेळी धोनी सीमारेषेपलीकडे पंतची यष्टीरक्षणाची प्रॅक्टीस घेताानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भारत सलामीच्या सामन्यासाठी सज्ज

भारताचा विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे. वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभूत करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध भारताला चांगली रणनीती करुन उत्तम खेळाडू निवडणंही महत्त्वाचं आहे.

सराव सामन्यात भारत विजयी

दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. यावेळी पहिल्या सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सनी तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनी मात देत भारताने आपल्या येण्याची डरकाळी फोडली आहे. दोन्ही सामन्यात सलामीवीरांनी उत्तम कामगिरी केली.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

India vs Australia सराव सामन्यातून निवडणार पाकिस्तान विरुद्धचे अंतिम 11, दोन खेळाडूंवर संघाबाहेर जाण्याची टांगती तलवार

T20 World Cup: ‘हार्दिकच्या हाती बॅट असो वा बॉल, तो सहज मॅच पलटू शकतो’; दिग्गज खेळाडूची स्तुतीसुमने

(In t2o world cups india vs pakistan match ms dhoni gave important wicket keeping tip to rishabh pant see Video)