AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असं

आयपीएल 2026 स्पर्धेतील 55वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात फिरकीपटूने एकही चेंडू टाकला नाही. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. पण असं पहिल्यांदा घडलं असं नाही. यापूर्वीही असं झालं आहे.

IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असं
IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असंImage Credit source: PTI
| Updated on: May 12, 2026 | 4:08 PM
Share

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरू असून आता स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने कूच करत आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सची काठावरची लढाई सुरू आहे. एका सामन्यात पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दिल्ली कॅपिटल्सचा प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे पंजाब किंग्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी राखून सामना जिंकला. पण या सामन्याची वेगळी असी खासियत ठरली. या सामन्यात फिरकीपटूने एकही षटक टाकलं नाही. या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या फिरकीपटूंना षटक दिलं नाही. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी या सामन्यात एकूण 10 गोलंदाजांना संधी दिली. त्यांनी एकूण 39 षटकं टाकली. यात एकही फिरकीपटू नव्हता. म्हणजेच 39 षटकं वेगवान गोलंदाजांनी टाकली.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात फिरकीपटूंनी गोलंदाजी न देण्याची ही काय पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही आयपीएल स्पर्धेत असं चित्र पाहायला मिळालं आहे. आयपीएलच्या पहिल्याच पर्वात असं घडलं होतं. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात असं घडलं होतं. हा सामना 28 एप्रिल 2008 रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झाला होता. यात एकही षटक फिरकीपटूंनी दिलं गेलं नाही. या सामन्यात 10 गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण यात एकही फिरकीपटू नव्हता. हा आयपीएल 2008 मधील 15वा सामना होता आणि यात 10 गोलंदाजांनी 39.4 षटकं टकाली होती.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 18 वर्षानंतर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा दुसरा सामना होता. यात एकाही फिरकीपटूने गोलंदाजी केली नाही. फिरकीपटूला गोलंदाजी न देण्याचं कारण म्हणजे खेळपट्टी ही फिरकीला अनुकूल नव्हती. वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने त्यांचा पुरेपूर फायदा घेतला गेला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आहे. पण त्यानेही गोलंदाजी केली नाही. तर श्रेयस अय्यरने अर्शदीप सिंग, यश ठाकुर, मार्को यानसेन, बेन ड्वार्शुइस आणि मार्कस स्टोइनिस या वेगवान गोलंदाजांना संधी दिली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी