PAK vs WI :पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची कमाल, एका सामन्यात वेस्ट इंडिजचे 10 विकेट्स घेत मिळवला विजय

वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने दुसरी कसोटी जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी साधली आहे. पाकिस्तानने दुसरी कसोटी तब्बल 109 धावांनी आपल्या नावे केली.

PAK vs WI :पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची कमाल, एका सामन्यात वेस्ट इंडिजचे 10 विकेट्स घेत मिळवला विजय
शाहीन आफ्रिदी
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 4:45 PM

मुंबई : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies) यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत 1-1 ची बरोबरी साधली आहे. पहिला कसोटी सामना केवळ 1 विकेटने पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानने 109 धावांनी विजय मिळवला. या विजयात सिंहाचा वाटा उचलला पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहीन आफ्रीदीने (Shaheen Afridi).

शाहीनने दुसऱ्या डावात केवळ 43 धावा देत महत्त्वाच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याआधी पहिल्या पहिल्या डावात शाहिनने 51 धावा देत 6 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. अशारितीने संपूर्ण सामन्यात 94 धावांच्या बदल्यात शाहिनने 10 विकेट मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे 329 धावांचे लक्ष्य गाठणारा वेस्ट इंडीजचा संघ 219 धावांवर सर्वबाद झाला. शाहीनसह नौमान अलीने तीन आणि हसन अली दोन विकेट्स घेतले.

शाहीनची कमाल पाकिस्तानची विजय

शाहीनने पाचव्या दिवशी चहापाणानंतर जोशुआ डिसिल्वाच्या रुपात अखेरचा विकेट घेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. 21 वर्षीय गोलंदाज शाहीनने पहिल्या डावांत 51 धावा देत सहा गडी तंबूत धाडले होते. त्यामुळे मालिकेत आतापर्यंत त्याने 11.28 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतले आहेत. वेस्टइंडीजने एका विकेटच्या बदल्या 49 धावांवर खेळ सुरु केला. पण पहिल्या सत्रातच त्यांनी चार विकेट गमावले. ज्यानंतरच्या फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही आणि वेस्ट इंडिजला 109 धावांनी पराभव पत्करावा लागला.

हे ही वाचा

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

PHOTO : IPL 2021 मध्ये 5 धाकड खेळाडूंची एन्ट्री, मनोरंजनात्मक गोलंदाजीसह फलंदाजीची रसिकांना पर्वणी

(In West indies vs pakistan match shaheen afridi took ten wickets and pakistan level series)