IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आजपासून (25 ऑगस्ट) सुरु होणार आहे. सद्यस्थितीला भारत मालिकेमध्ये 1-0 च्या फरकाने आघाडीवर आहे.

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
भारत विरुद्ध इंग्लंड
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Aug 25, 2021 | 10:43 AM

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीमध्ये जिंकून भारत आघाडी वाढवण्यासाठी तर इंग्लंडचा संघ तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी भारतीय संघाचा विचार करता संघात दोन बदल होऊ शकतात. संघात होऊ शकणारे दोन्ही बदल हे मधल्या फळीतील फलंदाजीसह गोलंदाजीत दिसू शकतात. त्यामुळे वरच्या फळीतील फलंदाजी पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच असू शकते. संघात होणाऱ्या बदलांपैकी एक बदल म्हणजे रवींद्र जाडेजाच्या (Ravindra jadeja) जागी आर अश्विनला (R Ashwin) संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे इशांत शर्माच्या जागी शार्दूल ठाकूरला खेळवलं जाऊ शकतं. जाडेजा एकही विकेट घेऊ शकला नसल्याने त्याला विश्रांची दिली जाऊ शकते. तर फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी शार्दूलला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. इंग्लंडचा मार्क वुड दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्या नसेल. तर फलंदाज डेव्हिड मलान तसेच ऑली पॉप यांच्यासह गोलंदाज महमूद याला इंग्लंड संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारी 25 ऑगस्ट रोजी लीड्स येथील हेंडिग्ले मैदानात खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून 3 वाजता नाणेफेक करण्यात येईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या या लिंकवर ही तुम्ही पाहू शकता.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), ऋषभ पंत, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

हे ही वाचा

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘ही’ आहे भारताची खरी ताकद, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

(Ind vs Eng 3rd test live how to watch india vs england 3rd test live streaming Marathi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें