IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 23, 2021 | 6:11 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

Aug 23, 2021 | 6:11 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे पार पडणार आहे. सध्या भारत मालिकेत 1-0 ने पुढे असून तिसरी कसोटी देखील भारतच जिंकेल असा दावा कारणासहीत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने केला आहे.

1 / 6
नासिर हुसैनने सर्वात पहिलं कारण सांगितलं विराट कोहली (Virat kohli).  विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. त्याची आक्रमकता संघाला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विराट फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत नसला तरी भारताच्या विजयात त्याची कर्णधारी एक महत्त्वाचं कारण असल्याचं नासिरने सांगितलं आहे.

2 / 6
नासिरने तिसऱ्या कसोटीत भारत विजयी होण्यासाठी आणखी एक बलाढ्या कारण भारताची भेदक गोलंदाजी सांगितलं. बुमराह एक शांत खेळाडू असला तरी त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडते. त्यात इतरही गोलंदाज उत्तम कामगिरी करत असून या सर्वांना विराटच्या आक्रमकतेची जोड मिळत असल्याने भारतासाठी हे फायद्याचं ठरत असल्याचंही नासिरनं सांगितलं आहे.

3 / 6
इंग्लंडचा संघ सध्या खराब खेळत असला तरी दुखापतींनी देखील इंग्लंडच्या संघाला पछाडले आहे.  स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर असे दिग्गज खेळाडू मालिकेबाहेर असल्याने संघ आधीच अडचणीत आहे. आता या सर्वांमध्ये मार्क वुडचे नावही जोडले गेले आहे. वुडही दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे इंग्लंड तिसरी कसोटी पराभूत होऊ शकतो, असं नासिरनं सांगितलं आहे.

4 / 6
नासिरनं सांगितलेल्या कारणांमध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण आहे भारताचा हिटमॅन रोहित शर्मा. सध्या तो संघातील एक्स फॅक्टर असून ज्याप्रकारे तो फलंदाजी करतो ते पाहून भारताला तिसऱ्या कसोटीतही याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया नासिरने दिली आहे. रोहितने दुसऱ्या कसोटीत ठोकलेल्या 83 धावां भारताच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.

5 / 6
या सगळ्यानंतर आर आश्विन एक कारण असू शकते ज्यामुळे भारत तिसरी कसोटी जिंकू शकतो. आश्विन इंग्लंड दौऱ्यात अजून एकही कसोटी खेळला नसला तरी त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी भारतासाठी सामना जिंकवून देऊ शकते असं नासिरनं म्हटलं आहे.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI