PHOTO : IPL 2021 मध्ये 5 धाकड खेळाडूंची एन्ट्री, मनोरंजनात्मक गोलंदाजीसह फलंदाजीची रसिकांना पर्वणी

उर्वरीत आयपीएल स्पर्धेला युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना नव्या पाच खेळाडूंचा खेळ उर्वरीत सामन्यांत अनुभवता येणार आहे.

1/6
आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. सामने सुरु होण्यासाठी महिनाभराचा कालावधी राहिला आहे. दुसऱ्या पर्वासाठी खेळाडू युएईमध्ये पोहचत आहेत. अशावेळी काही नव्या खेळाडूंचे आगमन आयपीएलमध्ये झाले आहे. यामध्ये आरसीबी, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये नवे खेळाडू दाखल झाले आहेत.

2/6
आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा  याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला ( Wanindu Hasaranga replaces Adam Zampa) घेण्यात आलं आहे. हसरंगा भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत मालिकावीर देखील राहिला होता.

3/6
हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू आरसीबीने त्यांच्या ताफ्यात घेतला आहे. दुष्मंथा चमिरा याला आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. चमिरा त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

4/6
श्रीलंकेच्या दोन खेळाडूंसह आरसीबीने टिम डेविड (Tim David) यालाही संघात स्थान दिलं आहे. सिंगापुरच्या या आक्रामक फलंदाजाला फिन एलनच्या जागी घेतले आहे.

5/6
सध्यस्थितीला सर्वात अडचणीत असलेला संघ राजस्थान रॉयल्समध्ये ग्लेन फिलिप्स हा न्यूझीलंडचा खेळाडू समाविष्ट होत आहे. राजस्थानचे जोफ्रा आर्चर, जोस बटलर आणि बेन स्टोक्स हे खेळाडू स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यामुळे आता ग्लेनकडून संघाला अधिक आशा असतील.

6/6
ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू नाथल एलिस याला पंजाब किंग्सने करारबद्ध केलं आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच बांग्लादेशविरुद्ध हॅट्रिक घेत रेकॉर्ड बनवला होता. त्यानंतर आता त्याला ही संधी देण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI