IND vs AFG : शुबमन-इशानची शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 403 धावांचं आव्हान

India vs Afghanistan 2nd Odi 1st Innings : टीम इंडियाने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरुद्ध विस्फोटक खेळी केली. भारताने अफगाणिस्तान विरुद्ध 402 धावा केल्या.

IND vs AFG : शुबमन-इशानची शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 403 धावांचं आव्हान
Ishan Kishan and Shubman Gill IND vs AFG
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 17, 2026 | 8:03 PM

कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. त्यामुळे आता टीम इंडिया 403 धावांचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सामन्यातील पहिल्या डावात काय काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

Follow Us