AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी

Ishan Kishan Century : रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इशान किशन चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. इशानने 52 चेंडूत संयमी अर्धशतक केलं. मात्र त्यानंतर इशानने गिअर बदलत फक्त 19 चेडूंत पुढील 50 धावा जोडत चाबूक शतक पूर्ण केलं.

IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी
Ishan Kishan Century IND vs AFGImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 17, 2026 | 5:26 PM
Share

टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक (Ishan Kishan Century) झळकावलं आहे. इशानने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये पहिल्या डावात शतक ठोकलं. चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या इशानने कर्णधार शुबमन गिल याच्यासह मोठी भागीदारी केली. या दरम्यान इशानने शतक झळकावलं. इशानने या शतकी खेळीसह खास कामगिरी केली.  इशानने नक्की किती चेंडूत शतक केलं? हे जाणून घेऊयात.

इशानचा झंझावात, एकाना स्टेडियममध्ये फायर शतक

इशान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर टीम इंडियातून बाहेर होता. मात्र इशानने या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक केलं. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इशान चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. इशानने त्याच्या खेळीतील पहिल्या 50 धावांसाठी 52 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर इशानने पूर्ण चित्रच बदललं. इशानने अर्धशतकानंतर पुढील 19 बॉलमध्ये 53 रन्स ठोकल्या. इशानने अशाप्रकारे फक्त 71 चेंडूत शतक पूर्ण केलं. इशानच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं

इशानने या शतकासह खास कामगिरी केली. इशान अफगाणिस्तान विरुद्ध वेगवान शतक करणारा एकूण तिसरा आणि दुसरा भारतीय फलंदाज ठरला. इशानने या शतकी खेळीत 4 षटकार आणि 14 चौकार लगावले. इशानने शतकानंतर फटकेबाजी सुरुच ठेवली होती. त्यामुळे इशानला सहज दीडशतक करण्याची संधी होती. मात्र इशान शतकानंतर जास्त वेळ मैदानात टिकून खेळण्यात अपयशी ठरला. इशानला शतकानंतर फक्त 25 धावाच जोडता आल्या. इशानने 79 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 14 फोरसह 125 रन्स केल्या.

अफगाणिनस्तान विरुद्ध वेगवान शतक करणारे 5 फलंदाज

  • शुबमन गिल : 77 बॉल, 2026
  • ग्लेन मॅक्सवेल : 76 बॉल, 2023
  • इशान किशन : 71 बॉल, 2026
  • रोहित शर्मा : 63 बॉल, 2023
  • इयन मॉर्गन : 57 बॉल, 2019

एकाच ओव्हरमध्ये 2 शतक

इशानने 33 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून शतक पूर्ण केलं. त्याआधी याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कॅप्टन शुबमन गिल याने शतक झळकावलं. शुबमनने एकदिवसीय कर्णधार म्हणून 77 चेंडूत पहिलंवहिलं शतक ठोकलं.

तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी

दरम्यान शुबमन आणि इशान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इशान किशन मैदानात आला. तेव्हा भारताची स्थिती 13.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 96 अशी होती. त्यानंतर इशान आणि शुबमन या दोघांनी 140 बॉलमध्ये 224 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र इशान आऊट होताच ही भागीदारी मोडीत निघाली.

Follow Us
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य