IND vs AUS | मिचेल स्टार्क याच्यासमोर ‘सूर्या’स्त, सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी

| Updated on: Mar 19, 2023 | 3:25 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. या सामन्यात मिचेल स्टार्क याच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादव हा सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला आहे.

IND vs AUS |  मिचेल स्टार्क याच्यासमोर सूर्यास्त, सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी
Follow us on

विशाखापट्ट्णम | टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत शानदार सुरुवात केली. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात जशी ऑस्ट्रेलियाची स्थिती केली होती, तशीच स्थिती आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची झाली आहे. टीम इंडियाने झटपट विकेट्स गमावल्या आहेत. टीम इंडियाच्या फलंदाजांनी मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्कराली. सुर्यकुमार यादव सलग दुसऱ्या सामन्यात मिचेल स्टार्क याच्या बॉलिंगवर आऊट झाला. यासह सूर्या या मालिकेत सूर्या सलग दुसऱ्यांदा पहिल्याच बॉलवर आऊट झाला म्हणजेच गोल्डन डक झाला.

मिचेल स्टार्क सामन्यातील 5 वी ओव्हर टाकत होता. याओव्हरमधील चौथ्या बॉलवर कॅप्टन रोहित शर्मा याला आऊट करत टीम इंडियाला अडचणीत आणलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. स्टार्कने सूर्याकुमारला पाचवा बॉल टाकला. स्टार्कने टाकलेला बॉल सूर्याच्या फ्रंट पॅडवर लागला आणि अंपायरने एलबीडबल्यू आऊट दिलं. विशेष म्हणजे स्टार्कची ही डबल विकेट मेडन ओव्हर ठरली.

मिचेल स्टार्कसमोर ‘सूर्या’स्त

नक्की काय झालं?

मिचेल स्टार्क सामन्यातील 5 वी ओव्हर टाकत होता. याओव्हरमधील चौथ्या बॉलवर कॅप्टन रोहित शर्मा याला आऊट करत टीम इंडियाला अडचणीत आणलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. स्टार्कने सूर्याकुमारला पाचवा बॉल टाकला. स्टार्कने टाकलेला बॉल सूर्याच्या फ्रंट पॅडवर लागला आणि अंपायरने एलबीडबल्यू आऊट दिलं. विशेष म्हणजे स्टार्कची ही डबल विकेट मेडन ओव्हर ठरली.

दरम्यान त्याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या वनडेतही सूर्या अशाच प्रकारे स्टार्कच्या बॉलिंगवर पहिल्याच बॉलवर आऊट झालेला.

सूर्याची गेल्या 10 डावातील कामगिरी

सूर्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरतोय, असं आम्ही नाही तर आकडेवारी सांगतेय. सूर्याला गेल्या 10 डावा अर्धशतकही करता आलेलं नाही. सूर्याची 10 डावातील 34 नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्याने गेल्या 10 डावांमध्ये 9,8,4,34*,6,4,31,14, 0, 0 अशा धावा केल्या आहेत.

टीम इंडियात 2 बदल

या दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन रोहित शर्मा याच्या कमबॅकमुळे इशान किशन याला बाहेर बसावं लागलं आहे. तर शार्दुल ठाकूर याच्या जागी अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.